महाजनांची जादु कायम!

0

महाराष्ट्र राय मंत्री मंडळातील जलसंपदा मंत्री गिरीश महाजन आणि त्यांचेवर सोपवण्यात आलेल्या निवडणुकीचीजबाबदारी यशस्वीरित्या पार पाडण्यात आतापर्यंत यशस्वी झालेले आहेत. सुरुवात त्यांच्या स्वत:च्या जामनेर नगरपालिका निवडणुकीत न.प.च्या सर्वच्या सर्व जागा भाजपने जिंकून इतिहास निर्माण केला. जामनेर नगरपालिकेत काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना यांचा सफाया करून एकछत्री अंमल निर्माण केला. त्याने तर मुख्यमंत्री फडणवीसांनी कोकणातीलपालघरच्या लोकसभा पोटनिवडणुकीची जबाबदारी गिरीश महाजन यांचेवर सोपवली. पालघर हा खम्युनिष्ठांचा गड होता. तेथे शिवसेनेचेही चांगलेच वर्चस्व असतांना पालघर लोकसभेच्या निवडणुकीत भाजपच्या उमेदवारांने विजय खेचून आणला. पालघर लोकसभा पोटनिवडणुकीतून ती जागा भाजपला न मिळणारी ती मिळाली त्यात जलसंपदा मंत्री गिरीष महाजन यांनाच क्षेय जाते. त्यानंतर जळगाव महानगरपालिकेची निवडणूक घोषित झाली. जळगाव महानगरपालिकेत गेल्या 35 वर्षापासून माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या खान्देश विकास आघाडीची सत्ता होती. त्या सत्तेला सुरुंग लावून तेथे भाजपला 75 पैकी 57 जागा मिळाल्या आणि 35 वर्षाच्या खान्देश विकास आघाडीच्या सत्तेला सुरूंग लावून निर्विवाद भाजपची सत्ता मिळविण्यात गिरीश महाजन यशस्वी झाले. आता धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीी जबाबदारी गिरीश महाजनांवर सोपवण्यात आली होती. आज धुळे महानगरपालिकेच्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले. त्यात एकूण 74 नगरसेवकांची संख्येपैकी 50 जागा भाजपला मिळाल्या. धुळे महानगरपालिकेत भाजपचेच आमदार अनिल गोटे यांची बंडखोरी भाजपला डोकेदुखी ठरतेय काय? अशी परिस्थिती या आभास निर्मार झाला होता. निवडणूकपुर्व आणि निवडणुकीच्या काळातआ. अनिल गोटे यांचे अद्वातद्वा वक्तव्य केली जात होती. हे सर्व होत असतांना जलसंपदामंत्री गिरीश महाजन हे मात्र डोक्यावर बर्फ ठेवल्यासारखे शांत होते. त्याचबरोबर तोंडावर साखर ठेवून आरोप- प्रत्यारोप करण्याच्या भाजनगडीत पडले नाहीत. भाजपला एक संधी द्या. एक वर्षात विकास करून दाखवतो. या विकासाच्या मुद्यावर गिरीश महाजनांनी जळगावची तसेच धुळे महानगरपालिका निवडणुक जिंकली. लोकांना विकास हवाय. त्यांना आरोप प्रत्यारोपात रस नाही. हे या निवडणुकीने सिद्ध केलेआहे. जामनेर तालुक्यातील शेंदुर्णी नगरपंचायत तर गिरीश महाजन यांच्या मतदार संघातील निवडणुक होय तेथे त्यांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय गरूड यांचे मुळ गाव ते त्याच गावचे रहिवासी विधान परिषदेचे माजी सभापती आचार्य गजाननराव गरूड यांचे गाव. त्या ठिकाणी गरूडांचे मोठ्या प्रमाणात वर्चस्व असतांनासुद्धा थेट नगराध्यक्षांच्या जागेसह 14 जागा जिंकून भाजपने निर्विवाद बहुमत प्राप्त केले. आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत जळगाव जिल्ह्यात भाजपचा गड कायम राहणार असल्याची जणू ही रंगीत तालीम म्हणता येईल.
भाजपच्या दृष्टीने रायात आणि देशात सर्वदूर परिस्थिती बिकट असली तरी निवडणुकीे सुत्रधारावर सर्वकाही अवलंबून असते हे गिरीश महाजनांनी दाखवून दिले आहे. या निवडणुकीत भाजपतर्फे साम- दाम दंडाचा वापर करण्यात आला आणि हे यश पक्षाचे नसून साम दाम दंडाचा आहे अशा प्रकारचा आरोप विरोधी पक्षातर्फे करण्यात येतो आहे. शेवटी िविजय तो विजयचअसे असले तरी या निवडणुका निवडणुकांची स्थिती वेगळी असते. या निवडणुकात प्रत्यक्षा एका निवडणुकीवर सत्ताधार्याांना लक्ष केंद्रीत करता येते. नाही म्हटले तरी सत्तेच्या थोडाबहुत परिणाम होतोय. परंतु गरीश महाजन यांना अशा निवडणुका जिंकण्याची जणू जादू केली आहे. धुळ्याात 50 जागा भाजपला मिळतील असे कदापिही वाटले नव्हते तेथे राष्ट्रवादी काँग्रेसचा चांगलाच जोर असल्याने धुळ्यााची निवडणूक अत्यंत अटीतटीची होईल असे वाटले होते. पण तेथेही महाजनांच्या जादुपुढेे विरोधकाचे काही चालले नाही. त्यातच धुळे शहराचे भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी या पद्धतीने पक्षांशी हुजत घातली आणि मै करे सो कायदा याप्रमाणे वागले ते त्यांना महागात पडले. धुळे मतदार संघातून लोकसभेवर निवडून येवून केंद्रात संरक्षण रायमंत्री असतांना त्यांचेशी या पद्धतीने गोटेंकडून टीका होत होती ते धुळेकरांच्या पचनी पडले नाही. त्यामुळे आता विधानसभेची अनिल गोटेंची जागासुद्धा अडचणीत आलेली आहे. अनिल कोटे हे स्वत: काचेच्या घरात राहत असतांना दुसर्याांच्या घरावर दगडफेक करण्याचा प्रयत्न केला. त्यातच ते फसले. पक्षांबरोबर त्यांनी समझोता केला असता तर त्यांचे सुद्धा काही उमेदवार महापालिकेत राहू शकले असते आज फक्त त्यांच्या धर्मपत्नी हेमा गोटे एकमेव निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे धुळे महापालिकेची निवडणुक गोटेंना महागात पडली. मापही गेले आणि तूपही गेले अशी स्थिती अनिल गोटेंची झालेली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.