मरण पत्करेन पण माफी मागणार नाही : राहुल गांधी

0

नवी दिल्ली : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत भारतात मेक इन इंडिया नसून रेप इन इंडिया झाल्याचे दिसत आहे, असं म्हटले होते. या वक्तव्याचा भाजपकडून विरोध करण्यात आला तसेच राहुल गांधींनी माफी मागावी अशी मागणीही भाजपने केली होती. यावर भाजपला प्रत्युत्तर देताना राहुल गांधींनी निशाणा साधला. मी राहुल सावरकर नाही राहुल गांधी आहे. मरण पत्करेन पण माफी मागणार नाही, असा आक्रमक पवित्रा राहुल गांधी यांनी घेतला आहे. तसेच, माफी मागायची असेल तर मोदींचे असिस्टंट असलेल्या अमित शहांनी माफी मागावी, असेही राहुल यांनी म्हटले.

दिल्लीच्या रामलीला मैदानावर काँग्रेसकडून मोदी सरकारच्या विरोधात भव्य रॅली काढण्यात आली आहे. नागरिकत्व सुधारणा विधेयक, महिलांवरील अत्याचार, आर्थिक मंदी आणि अन्य मुद्द्यावरुन काँग्रेस या रॅलीच्या माध्यमातून केंद्र सरकारवर निशाणा साधणार आहे. रामलीला मैदानात आयोजित करण्यात आलेल्या रॅलीमुळे काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे. देशातील कानाकोपऱ्यातून मोठ्या प्रमाणात काँग्रेस कार्यकर्ते  या रॅलीत सहभागी झाले आहेत. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी, राहुल गांधी, मनमोहनसिंग आणि प्रियंका गांधी यांच्यासह अन्य दिग्गज नेते सहभागी झाले आहेत.

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.