मनपा निवडणुकीसाठी रा.कॉ. नेतृत्वात नकारघंटा

0

राष्ट्रवादी काँग्रेस स्थापनेचा दिवस रविवार दिनांक 10 जून रोजी राज्यात सर्वत्र साजरा करण्यात आला . राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांचे उपस्थितीत पुणे येथे वर्धापनदिन साजरा करण्यात आला . राज्यातील सर्व प्रमुख नेते व कार्यकर्ते उपस्थितीत होते. राज्यातील सर्व तालुकास्तरावर तसेच जिल्हा स्तरावर राष्ट्रवादीचा वर्धापन दिन सोहळा पार पडला . सकाळी ठीक 10 वाजता माजी खासदार ईशवरलाल जैन यांच्याहस्ते ध्वजारोहण करण्यात आले . माजी मंत्री गुलाबराव देवकर तसेच इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते . यावेळी गुलाबराव देवकर आणि इतर पदाधिकार्‍यांनी आगामी जळगाव मनपा निवडणुकीसाठी नेतृत्व करावे असा आग्रह केला. तेव्हा ईश्‍वरलाल जैन यांनी त्याला नकार देऊन गुलाबराव देवकरांनी ते नेतृत्व करावे असा सल्लाही त्यांनी दिला . त्याआधी गुलाबराव देवकरांनी तसेच ईश्‍वरलालजी जैन यांनी एकमेकांना पेढा भरवला . यावेळी जैन म्हणाले कि पेढा खायला हरकत नाही आणि येथून मूळ विषयाला सुरुवात झाली. जिल्ह्यात काही वर्षांपूर्वी क्रमांक एकवर असलेला राष्ट्रवादी पक्ष आता तिसर्‍या क्रमांकावर गेला आहे . पक्षाला पुन्हा क्रमांक एक वर नेण्यासाठी सर्वानी एकत्र यावे आणि ईश्‍वरलाल जैन यांनी त्यासाठी पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा गुलाबराव देवकारानी करताच ईश्‍वरलाल जैन यांनी त्यांना खटकत असल्याचा पाढा पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांजवळ व्यक्त केला . जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेली गटबाजी जणू चव्हाट्यावर आली .
जिल्हायात राष्ट्रवादी काँग्रेसचे काही वर्षांपूर्वी 5 आमदार
होते . आता डॉ. सतीश पाटलांच्या रूपाने एकमेव आमदार आहे . पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार आणि ईश्‍वरलाल जैन यांच्यातील मैत्री सर्वश्रुत आहे . जळगाव जिल्हा मध्यवर्ती सह . बँकेच्या 3 वर्षांपूर्वी झालेल्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत ईश्‍वरलाल जैन यांचे नेतृत्वात पॅनल होते . पक्षाचे पॅनल सोडून गुलाबराव देवकरांनी माजीमंत्री एकनाथराव खडसे यांचे पॅनलमधून निवडणूक लढविली. हि खदखद जैनांनी व्यक्त केली . तसेच जामनेरात गिरीश महाजन यांच्यासोबत जामनेर जीन प्रेसमधील निवडणूक पॅनलमध्ये सहभागी झालो तर माझ्यावर टीका का होते ? असा सवाल ईश्‍वरलाल जैन यांनी केला . त्यावर आतापर्यंतची नाराजी सोडा अन गॉड व्हा असे म्हणताच जैन यांनी आपले मन मोकळे केले . राष्ट्रवादी काँग्रेसने मला भरभरून दिले आहे . त्यामुळे आता कसली अपेक्षा नाही . नेतृत्व देवकरांना द्या मी पक्षांसोबतच आहे . पक्षावर माझा कसलाही राग नाही . जेथे गरज पडेल तेथे मी पक्षसोबतच उभा आहे . माझया प्रकृती अस्वास्थामुळे मी पक्षासाठी जास्त वेळ देऊ शकत नाही . मनपा निवडणुकीत नेतृत्व देवकरण द्या मी पक्षासोबतच असल्याचे त्यांनी सांगितले .
एकंदरीत काही वर्षांपूर्वी जिल्ह्यात नंबर एकवार असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला सध्या घरघर लागली आहे . गेल्या 25 वर्षपासून जळगाव महानगर पालिकेत सत्तेपर्यंत पोहचू शकलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसने आता मनपा निवडणुकीसाठी नेतृत्व स्वीकारण्यावरून नकार घंटा सुरु आहे . अडीच महिन्यावर निवडणूक आली असताना एकोप्याऐवजी गटबाजीचे प्रदर्शन दिसून येत आहे . त्याचबरोबर मनपा निवडणुकीसाठी काँग्रेससोबत युती करून दोन्ही पक्षाच्यावतीने एकसंघ पॅनल करून सत्ताधारी खान्देश विकास आघाडी अथवा भाजपाला जोरदार टक्कर देण्यासाठी प्रयत्न झाला पाहिजे . परंतु तसे होण्याऐवजी राष्ट्रवादीतील गटबाजी उघड होते आहे . ईश्‍वरलाल जैन यांना टार्गेट करून एकाकी पडण्याचा प्रयत्न झाला . त्यांचेवर नको ती टीका करण्यात आली . पक्षाचे वरिष्ठ नेते अजित पवार यांनी जैन यांचेवर त्यांचे नाव न घेता जहरी टीका केली. गुलाबराव देवकर इंजिनिअरिंग कॉलेज परिसरात झालेल्या मेळाव्यात अजित पवार म्हणाले ज्यांची लायकी नगरसेवक होण्याची नसताना त्यांना पार्लमेंटमध्ये बसवले . त्यामुळे व्यक्तीपेक्षा पक्ष मोठा असतो हे त्यांनी विसरू नये . अजित पवारांच्या या टीकेत त्यांचा उन्माद दिसून आला . आता पक्ष जिल्ह्यात तीन क्रमांकावर गेला असताना महानगर पालिका निवडणुकीसाठी ईश्‍वरलाल जैन याणी नेतृत्व करावे असा आग्रह केला जातोय . म्हणजे नगरसेवक म्हणून निवडून येण्याची लायकी नसणार्‍या ईश्‍वरलाल जैन यांनाच मनपा निवडणुकीचे नेतृत्व देण्याची भाषा केली जातेय . हि अजित पवारांना चपराक बसली नव्हे काय ?तेव्हा पक्षात चढउतार होतच असतात . त्याची जबाबदारी एकावर ढकलून चालणार
नाही . पक्ष सत्तेत असताना सत्तेची हवा काही औरच असते . सत्तेची हवा डोक्यात शिरली कि, अशी वक्तव्ये होत
असतात . ईश्‍वरलाल जैन पक्षाचे जुने एकनिष्ठ कार्यकर्ते तसेच शरद पवार यांच्या ते खास मर्जीतले आहेत. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस रुजवण्यात आणि वाढविण्यात त्यांचा खारीचा वाटा नाकारता येणार नाही . जामनेर हे त्यांचे मूळ गाव . त्या तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्षश निवडताना त्यांना विश्‍वासात घेतले नाही. याबाबत त्यांना राग येणे साहजिक आहे . जामनेर विधानसभा मतदार संघातून आमदार म्हणून कधीही निवडून येऊ देणार नाही . इतकेच नव्हेत मी हयात नसलो तर मनीषला सांगून ठेवतो सदर व्यक्ती आमदार होता काम नये . एक वरिष्ठ नेता एवढी टोकाची भूमिका घेतो तेव्हा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱयांनी अंतर्मुख होण्याची गरज आहे . मनपा लोकसभा व विधानसभा निवडणुकीपूर्वीच हा इशारा म्हणता येईल .

Leave A Reply

Your email address will not be published.