मनपा कर्मचारी महिलेवर माथेफिरुचा चाकूहल्ला!

0

रुबेला लसीकरणाबाबत समाजात गैरसमज कायम

जळगाव दि. 17-
गोवर व रुबेला लसीकरणाचा सर्व्हे करण्यासाठी आलेल्या महिला कर्मचार्‍यावर एका इसमाने चाकूहल्ला केला. त्यात बालंबाल बचावल्यावर महिला कर्मचार्‍यांनी पळ काढत स्वत:चा जीव वाचविला. सदर घटना दि. 16 रोजी दुपारच्या सुमारास शिवाजीनगरातील मस्लिम बहुल वस्तीत घडली.
मनपा आयुक्तांना पिडीत रेखा निकुंभ, मनपा शाळेतील मदतनीस यांनी तक्रार अर्ज दिला आहे. प्रशासनाच्या आदेशानुसार लसीकरणाचा सर्व्हे आम्ही करत आहोत. दि. 16 दुपारी रेखा निकुंभ व अर्चना खैरनार यासोबत शिवाजीनगर भागात सर्व्हे करत असताना त्या भागातील एका इसमाने चाकूहल्ला केला. सोबतच्या सहकारी अर्चना खैरनार यांनी आवाज दिल्याने माझा बालंबाल जीव वाचला. असून मला दोन लहान मुले आहेत. तरी आम्हाला लसीकरणाची ड्युटी द्यावी,असे दिलेल्या अर्जात म्हटले आहे.
दरम्यान, रुबेला लसीकरणाचा सर्व्हे करणार्‍या महिला कर्मचारी व नगरसेविका उज्वला बेंडाळे यांनी दि. 17 रोजी दुपारी 2 वा. आयुक्त चंद्रकांत डांगे यांची भेट घेवून संरक्षण देण्याची मागणी केली. यावेळी आयुक्तांनी पोलिसांत गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. त्यानुसार सदर कर्मचारी शहर पोलिसांतही दाखल झाले मात्र पोलिसांत गुन्हा दाखल न करताच निघून गेल्याचे पोलीस सुत्रांनी सांगितले.
नि:शुल्क लसीकरणाला विरोध
गोवर रुबेला लसीला बाहेर अंदाजे पंचवीसशे रुपये खर्च आहे. शासनाने ही लस मुलांना नि:शुल्क उपलब्ध करुन दिलेली आहे. मात्र शासनाच्या चांगल्या योजनेला गैरसमजूतीने नागरिकांकडूनच हरताळ फासला जात आहे. लसीकरणाचा लाभ सर्वांनीच घेतला असताना गरसमजूतीने विरोध होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.