मध्य रेल्वेच्‍या मुख्य जनसंपर्क अधिकारीपदी शिवाजी सुतार रुजू

0

भुसावळ (प्रतिनिधी)- भारतीय रेल्वे वाहतूक सेवा(आयआरटीएस) वर्ष २००८ बॅचचे अधिकारी  शिवाजी मारुती सुतार यांनी मध्य रेल्वेच्या मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून काल सुनील उदासी यांच्याकडून पदभार स्वीकारला.श्री.उदासी यांची मुंबई रेल्वे  विकास महामंडळ येथे प्रतिनियुक्तिवर बदली झाली आहे.

मध्य रेल्वेत मुख्य जनसंपर्क अधिकारी म्हणून पदभार स्वीकारण्यापुर्वी शिवाजी सुतार मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक पदावर कार्यरत होते. त्यांनी ईस्ट कोस्ट रेलवे मध्ये विशाखापट्टनम स्टील प्लांट येथे एरिया व्‍यवस्‍थापक,वॉल्टेयर विभागात विभागीय वाहतूक व्यवस्थापक,पारादीप पोर्टचे एरिया व्‍यवस्‍थापक या सारख्या  विभीन्न पदांवर कार्य केले आहे.  त्यांनी मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विभागीय वाणिज्य व्यवस्थापक, विभागीय परिचालन व्यवस्थापक म्हणूनही कार्य केले आहे.सुतार यांना उपनगरीय परिचालनाचा सखोल अनुभव आहे.

त्‍यांना रेल्वेतील उत्कृष्ट कार्यासाठी सन २०१७ मध्ये  मध्य रेल्वे महाव्यवस्थापक पुरस्कार आणि सन २०१८मध्ये रेल्वे मंत्री राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे.  त्यांनी मुंबई विभागात उपनगरीय रेल्वे सेवा, मेल-एक्सप्रेस गाड्यांच्या संचलनात सुधारणा करण्यासाठी सक्रीय योगदान दिले आहे. त्यांनी  उपनगरीय रेल्वेचे वेळापत्रक तयार करण्यात महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे. ज्यामुळे अतिरिक्त उपनगरीय सेवा चालवण्यासाठी मार्ग उपलब्ध झाला.

Leave A Reply

Your email address will not be published.