मंत्रिमंडळात डावलल्याने राष्ट्रवादीचा ‘हा’ आमदार देणार राजीनामा !

0

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी नाट्य सुरू झाले आहे. बीड जिल्ह्यातील माजलगावचे राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश सोळंके हे आज (मंगळवार) दुपारी १२ वाजाता आपल्या आमदारकीचा राजीनामा विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांच्याकडे सुपूर्द करणार असल्याची चर्चा आहे. मंत्रिमंडळात डावलल्याने त्यांनी हे पाऊल उचलले असल्याचे म्हटले जात आहे.

माजी उपमुख्यमंत्री सुंदरराव सोळंके यांचे पुत्र आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार प्रकाश सोळंके यांनी यावेळी भाजपचे रमेश आडसकर यांचा पराभव केला होता. सोमवारी झालेल्या मंत्रिमंडळ विस्तारत त्यांना मंत्रिपद मिळेल अशी अपेक्षा होती, मात्र त्यांना डावलले गेल्याने सोळंके नाराज झाले, त्यांनी मंगळवारी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांची वेळ घेतली असून आपल्या आमदारकीचा राजीनामा देणार आहेत अशी चर्चा आहे.दरम्यान, सोळंके पुण्याहून मुंबईकडे रवाना झाले आहेत. सोळंके यांनी राजीनाम्याची कल्पना पक्षाध्यक्ष शरद पवारांना दिली आहे. मात्र ते पवारांची भेट घेणार नाहीत असे सुत्रांकडून समजते. मराठवाडय़ातून राष्ट्रवादी काँग्रेसने राजेश टोपे आणि धनंजय मुंडे यांची मंत्रिपदी वर्णी लावली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.