भोपाळ रेल्वेस्थानकातील पुलाचा काही भाग कोसळला; ८ जण जखमी

0

भोपाळ : मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमधील रेल्वे स्थानकातील फुटओव्हर पुलाचा काही भाग कोसळला. यामध्ये आठ नागरिक जखमी झाले आहेत.


माहितीनुसार, भोपाळ रेल्वे स्थानकातील प्लॅटफॉर्म क्र. ३ वरील फुटओव्हर पुलाचा काही भाग कोसळला. या घटनेची माहिती मिळताच रेल्वे प्रशासनाचे अधिकारी आणि पोलीस घटनास्थळी दाखल झाले. बचावकार्य सुरु असून जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.