भोनक नदीवरील पुल कठड्या अभावी धोकेदायक

0
  बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष.
साकळी ता. यावल (वार्ताहर )  अंकलेश्वर बऱ्हाणपुर महामार्गावर साकळी येथून जवळच असलेल्या नावरे फाट्याजवळील भोनक नदीवरील पुल कठड्या अभावी जिवघेणा ठरत आहे. महाराष्ट्र , मध्यप्रदेश, गुजरात अशा तिन राज्यांची वाहतूक या भोनक नदीवरील पुलावरून होते. दररोज अवजड वाहतूकीची किमान दोन-तिन हजार वाहने येथून ये-जा करतात. बऱ्हाणपुर, यावल, रावेर या केळी पट्ट्यातील केळीने भरलेले ट्रक याच रस्ताने पुढे गुजरात, मध्यप्रदेश ला जातात. सतत वर्दळ असलेल्या भोनक नदी पुल हा कठड्या अभावी धोकेदायक जीवघेणा ठरत आहेत आणि कठड्या अभावी मोटर-सायकल स्वार पुलावरून खाली पडल्याने अनेक व्यक्ती गंभीर जखमी झाले असल्याच्या  घटना अनेकदा  घडल्या आहेत . अशा जीवघेण्या प्रकाराकडे बांधकाम विभागातील अधिकाऱ्यांरी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्याचे वाहन धारकांकडून बोलले जात आहे. सदर पुलावरून मोटर-सायकल स्वार जात असतांना अचानक अवजड वाहतूक करणारे वाहन बाजूने गेले असता मोटर-सायकल धारकांना आपले वाहन पुलावरून खाली तर पडणार नाही ना असा प्रश्न उपस्थित होत असतो. लोकप्रतीनिधींही साफ दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. लोकप्रतीनिधी व बांधकाम विभागाने त्वरीत लक्ष देऊन पुलाच्या दोन्ही कडेला कठडे तयार करण्यासाठी उपाययोजना करावी अशी मागणी वाहन धारकांकडून होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.