भुसावळ शहरातील विविध कामे मार्गी लागण्यासाठी उद्या रास्तारोको

0

भुसावळ (प्रतिनिधी) :-  शहरातील विविध कामे मार्गी लावण्यासाठी उद्या दि. ७ रोजी दुपारी २ वाजता यावल नाक्यावरील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याजवळ रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार असल्याची माहिती माजी आमदार संतोष चौधरी यांनी आज शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परीषदेत दिली. शहरात वाढती बेरोजगारी यामुळे गुन्हेगार व गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचा आरोप यावेळी केला. तसेच शहरात वाढती बेरोजगारी यामुळे गुन्हेगार व गुन्हेगारीचे प्रमाण वाढल्याचा आरोपही माजी आ. चौधरी यांनी यावेळी केला.

या आहेत मागण्या 

शहरातील रस्त्यांची दुरवस्था थांबवावी, अमृत योजनेत झालेल्या भ्रष्टाचार प्रकरणी नगराध्यक्ष, मुख्याधिकारी,  तत्कालीन सूचक अनुमोदक यांचेसह सबंधित दोषींकडून वसुली करावी त्यांचे 7/12 उताऱ्यावर बोझे लावावे, तसेच पालिकेतील बोगस बिलांची चौकशी करण्यात यावी, शिवाय कोच फॅक्टरीच्या नावावर अतिक्रमण काढून सुमारे अडीच ते तीन हजार गोरगरीबांचे संसार उघड्यावर आल्याने अतिक्रमणधारकांना पुन्हा रेल्वेच्या त्याच जागेवर निवारा बांधून द्यावा, जनतेची फसवणूक करून गरीबांना बेघर करणारे रेल्वेचे तत्कालीन डीआरएम आर के यादव  व अधिकारी एम एस तोमर यांची वरिष्ठस्तरावर चौकशी व्हावी, रस्त्यांच्या दुरवस्थेमुळे बऱ्याच नागरिकांना  नाहक प्राण गमावावे लागल्याने लोकप्रतिनिधीं विरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा आदी मागण्यांसाठी मंगळवार दुपारी दोन वाजता यावल नाक्यावरील राष्ट्रपिता महात्मा गांधी पुतळ्याजवळ रस्ता रोको आंदोलन करण्यात येणार, अशी   माहिती माजी आमदार संतोष चौधरी यांनी दिली.

शहरातील डॉ बाबासाहेब अंबेडकर पुतळा ते अमरदीप टॉकीज चौक दरम्यान असलेल्या गटारिवर पाईप टाकन्याकरीता लवकरच ” भिक मांगो आन्दोलन करण्यात येवून हे काम पूर्ण करणार असल्याचेही देखील माजी आमदार संतोष चौधरी यांनी सांगीतले. प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती सचिन चौधरी ,राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष नितीन धांडे, जनआधारचे गटनेता उल्हास पगारे, अशोक उर्फ आऊं चौधरी, सौ अनिता खरारे, बुटासिंग चितोडीया, युवराज पाटील, प्रकाश निकम, रवींद्र निकम ,आदीं उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.