भुसावळ रेल्वे स्थानकावर डिजिटल डॉलचे उद्घाटन

0

भुसावळ;– येथील प्लॅटफॉर्म क्रमांक 4 व सहा मधील वेटिंग रूम मध्ये बेटी बचाव बेटी पढाव डिजिटल डॉलचे उद्घाटन आमदार संजय सावकारे व डॉ. राजेंद्र फडके यांच्या हस्ते करण्यात आले . ह्या डिजिटल टोलच्या माध्यमातून नागरिकांना मुली शिकवा मुली वाचवा हा संदेश देण्यात आला

. यावेळी आमदार संजय सावकारे यांनी मनोगत व्यक्त केले . मुली ह्या देशाचे भवितव्य आहे . त्यांना शिकवावे जेणेकरून आपल्या पायावर उभे राहून त्या आपले भवितव्य निर्माण करू शकतात . आपल्या पायावर उभी राहून स्वतःचे उदाहरण करू शकते. यासाठी पालकांनी मुली व मुले वाचवा असे आपल्या मनोगतात व्यक्त केले. या उद्घाटनावेळी भुसावळचे लोकनियुक्त नगराध्यक्ष रमण भोळे उपनगराध्यक्ष लक्ष्मी मकासरे माजी उपनगराध्यक्ष युवराज लोणारी नगरसेवक मनोज बियाणी देवेंद्र वाणी प्राध्यापक सुनील प्रमोद नेमाडे प्रशांत नेवे आधी भाजपा कार्यकर्ता उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.