भुसावळ पुन्हा हादरल ! तरुणाचा धारदार हत्याराने वार करून खून

0

भुसावळ (प्रतिनिधी) । शहरात तरुणावर गोळी झाडून हत्या केल्याची घटना ताजी असतानाच रविवारी रात्री पुन्हा खडका रोड चौफुलीवर एका २० वर्षीय तरुणाच्या छातीवर पोटावर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आल्याची घडलीय.  शेख अल्तमश शेख रशीद (वय २०, रा. बाबला हॉटेल जवळ, भुसावळ ) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक असे की, खडका चौफुलीवर रविवारी दिनांक १३ रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास मयत अल्तमश शेख रशीद या युवकावर कोणीतरी अज्ञात व्यक्तीनी चाक़ूने  सपासप वार करुन जखमी केले.

दरम्यान, जखमीस उपचारासाठी डॉ.मानवतकर दवाखान्यात आणले असता डॉक्टरांनी मृत झाल्याचे  सांगितले . यावेळी  डॉ.मानवतकर यांच्या दवाखान्यात नातेवाईक व मित्र मंडळींची गर्दी झाल्याने काही विपरीत घटना घडू नये यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांनी आर.सी.पी.पथकांच्या कर्मचाऱ्यांना बोलावून  दवाखाना परिसरात बंदोबस्त लावण्यात आला होता. हा खून नेमका कुणी व कोणत्या उद्देशातून केला  याचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. खुनाची माहिती कळताच घटनास्थळी  पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठचे प्रभारी निरीक्षक बाबासाहेब ठोंबे सपोनि अनिल मोरे,बाजारपेठ पोलीस स्टेशनचे गुन्हे शोध पथक व सहकार्‍यांनी घटनास्थळी धाव घेतली. याप्रकरणी बाजारपेठ पोलिसात रात्री उशीरा पर्यंत गुन्हा नोंद प्रक्रिया  सुरु होती आरोपी फरार झाले असून पोलीस  शोघ घेत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.