भुसावळ तालुक्यात बेलव्हाळ, सुनसगाव व साकेगाव येथे गावठी दारु व रसायन जप्त

0

भुसावळ | प्रतिनिधी

संचारबंदी मुळे  सर्वच दारु विक्रीची दुकाने बंद असल्याने त्याचाच गैरफायदा घेत तालुक्यातील  बेलव्हाळ, सुनसगाव व साकेगाव य्या तीन ठिकाणी  गावठी दारु निर्मिती करुन  विक्री करण्याचा डाव पोलिसांनी उधळून लावीत  तयार केलेली हातभट्टी दारू व कच्चे रसायन  पोलिसांनी जप्त करीत आरोपीं विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
यामध्ये  पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार  यांनी बुधवार रोजी  येथील तापी नदीपात्रात सुरु असलेला गावठी दारु निर्मितीचे अड्डे उद्ध्वस्त केले. संचारबंदी (लॉक डाऊन) मध्ये सुद्धा अवैधदारू बनविण्यात येत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्यावरुन भुसावळ तालुक्यातील बेलव्हाळ,सुनसगाव, साकेगाव  येथील गावठी हातभट्टी अड्डयांवर  तालुका पोलिसांनी बुधवार ३१ मार्च रोजी कारवाई करून ३ ड्रम ६०० लिटर कच्चे रसायनसह एकूण १३० लीटर गावठी हातभट्टी दारू अंदाजे २६ हजार ७०० रुपये किंमतीच्या मुद्देमालासह जप्त करून तिघांविरुद्ध  तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे . तर चौघां विरुद्ध भुसावळ तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील बेलव्हाळ वाघूर नदी पात्रांच्या कडेला १२ वाजेच्या सुमारास  साहेबराव उत्तम सोनवणे याच्या ताब्यात महू नवसागर गूळ मिश्रीत कच्चे रसायनचे ३ ड्रम ६०० लिटर आणि गावठी हात भट्टीची ७० लिटर तयार दारू अंदाजे किंमत २१ हजार ३०० रु मुद्देमाल जप्त केले .तर दुसऱ्या प्रकरणात  सूनसगाव येथील लीलाधर वसंत कोळी याच्या कडे ३० लिटर तयार दारू २७०० रु कि असे मिळून आला .तसेच साकेगाव येथील भिका शांताराम कोळी सिंगार बर्डी भागात गावठी  हात भट्टीची तयार ३० लिटर दारू २७०० किमतीची मिळून आली.

त्यांच्या विरुद्ध प्रोव्ही. कायदा प्रमाणे आणि जारी केलेल्या आदेशाचे अवमानता केली म्हणून भादवि कलम 270 ,271 ,188, अन्वये असे तीन  गुन्हे दाखल करण्यात आले आहे .

तसेच १८८ नुसात गुन्हे दाखल ;   आरोपी बाळकृष्ण शिवराम कोळी , रमेश कैलास बारी,  समाधान रामचंद्र बीजागरे  ,विजय गोविंद भिल सर्व राहणार क़ुर्ह ,यां चौघा आरोपी विरुद्ध  संचारबंदी चे उल्लंघन केल्या प्रकरणी कलम 188 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

ही कारवाई उप विभागीय पोलीस अधिकारी  गजानन राठोड  यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रामकृष्ण कुंभार, स.पो.नि. अमोल पवार ,पोहेकॉ. युनूस शेख विठ्ठल, फुसे राजेंद्र पवार ,विजय पोहेकर, प्रेमचंद सपकाळे ,शिवाजी  खंडाळे ,सुनील चौधरी, यांनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.