भुसावळ तालुक्यात कॉंग्रेसच्या शेकडो महिलांचा शिवसेनेत प्रवेश

0

भुसावळ (प्रतिनिधी)- शिवसेनेचे पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून भुसावळ तालुक्यातील सामाजिक कार्य करणाऱ्या असंख्य महिलांनी मुक्ताईनगर येथे नुकताच शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. प्रसंगी जय भवानी जय शिवाजी, शिवसेना झिंदाबाद च्या जोरदार घोषणा महिलांनी दिल्या.

दरम्यान  शिवसेना जिल्हा प्रमुख तथा आमदार चंद्रकांत पाटील, शिवसेना महिला आघाडी रावेर लोकसभा संपर्क प्रमुख श्रीमती उषाताई मराठे यांच्या प्रमुख उपस्थितीत सर्व महिलांचे स्वागत करण्यात आले.

यावेळी आमदार चंद्रकांत पाटिल यांचे आदेशानव्ये तसेच रावेर लोकसभा संपर्क प्रमुख श्रीमती उषाताई मराठे यांच्या कुशल मार्गदर्शनाखाली  महिला आघाडी तालुका संघटिका भूराताई रोहिदास चव्हाण यांच्या नेतृत्वात भुसावळ तालुक्यातील शिवसेना पक्ष वाढीकरिता संघटन वाढवून पक्ष  बळकटी करीता महिलांची फौज उभी करण्यात आली आहे .महिलांचा मान सन्मान वाढून महिलांवरिल अत्याचार व अन्याय रोख़ून त्यांचे पाठीशी उभे राहावे यांउद्देशाने तसेच 80टक्के समाजकारण व 20 राजकारण या धोरणा नुसार विश्वास ठेवून  तमाम कॉंग्रेस मधील महिलांनी शिवसेनेत प्रवेश केला.

. महिला आघाडीचे कार्य जिल्ह्यात उत्कृष्ट असून महिलांसाठी असलेल्या महाराष्ट्र सरकारच्या अनेक योजना गावागावात पोहचवा, पक्ष संघटना वाढवण्यासाठी जोमाने काम करा असा सल्ला सुद्धा आमदार चंद्रकांत पाटील यांनी या प्रसंगी दिला. तसेच यांनी न डगमगता एकजुटिने एकदिलाने सर्वानी कार्य करा ,उत्कृष्ट कार्य करून  नारी शक्तिची ताकद तालुक्यासह जिल्ह्यात दाखवा असे आवाहन शिवसेनेच्या रावेर लोकसभा संपर्क प्रमुख श्रीमती उषाताई मराठे यांनी यावेळी केले.

शेकडो महिलांचा शिवसेनेत प्रवेश 

छायाताई बोंडे, रेहान बी शेख यासीन, नफिना गफफार खान, नजमा मुशीर , तायर इरफान , नूरबजा रईस , फर्जना नबाब , रजिया शे गफफार, सजेदा बी परबेज, कमल खान, रुकसाना हुसेन खान, सईदा बी निजाम , मुवारफ सैरयद रियास्त, अफसना नजीर ,कमरू ननिसा , रजिया बी , शाहीन बी ,मालती शिंदे, अनीता बाविस्कर , शोभाबाई कचरे, गीताबाई शिरसाठ सुनीता सावळे . शारदा पवार,  रेखा पवार , अनिता राखवडे,  सुमन खुराडे , आशा जाधव, ज्योती राखवडे , संविता पाटील यांचेसह असंख्य महिलांनी शिवबंधन बांधून शिवसेनेत प्रवेश केला.यात बहुतांशी मुस्लिम समाज भगिनी यांचा समावेश आहे .

कार्यक्रमास  यावेळी  महिलां आघाडीच्या  पूनम बऱ्हाटे,  रोहिणीताई पाटील,  महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख सुषमा शिरसाट,  रजनीताई चौधरी, शोभा कोळी तालुका समन्वयक सुनीता तळले ,उपतालुका संघटिका उज्वला सोनवणे, शहर संघटिका सरिताताई कोळी, शारदा भोई उपशहर प्रमुख भावना गायकवाड भारती गोसावी, अनिता पवार, लक्ष्मी खरे, रंजना गोसावी, हिराताई पाटील, पुष्पा खरे , सुंनदा विरगट, पूजा गिरणारे , मंगल ठाकूर, ज्योती मराठे , सोजा भोई,  शोभा कनोजे , सदनां तडवी , शुभांगी सावकारे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी व महिला आघाडीच्या पदाधिकारी व शिवसैनिक कार्यकर्त्यां उपस्थितीत हा प्रवेश सोहळा संपन्न करण्यात आला.

Leave A Reply

Your email address will not be published.