भुसावळात सात वर्षीय बालिकेचा विनयभंग ; आरोपी फरार, गुन्हा दाखल

0

भुसावळ (प्रतिनिधी)- शहरात कोळी वाडा भागातील सात वर्षिय बालिकेचा विनयभंग प्रकरणी येथील एका  विरुद्ध गुन्हा दाखल झाला असून आरोपी फरार आहे .

दि.25 डिसेंबर रोजी दुपारी 12 ते 12.30 वाजेचे दरम्यान आरोपी  उत्तम मीटकर उर्फ अण्णा पूर्ण नाव माहीत नाही. रा. कोळी वाडा, शंकर बेकरी जवळ, भुसावळ याने अंगणात खेळणाऱ्या 7 वर्षाच्या चिमुरडीस टीव्ही पाहण्याच्या बहाण्याने घरात बोलावून लज्जास्पद कृत्य केल्याची घटना घडली. या प्रकरणी मुलीच्या आईने शहर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरुन भुसावळ शहर पो.स्टे गु.र.नं.273 भा.द.वि.कलम 354,354 (अ)354(इ), बाललैंगिक अपराधापासुन संरक्षण अधिनियम 2012 कलम 7, 8,12  प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी उत्तम मीटकर उर्फ अण्णा यांचे विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे आरोपी फरार असून तपास उपविभागीय पोलीस अधिकारी गजानन राठोड यांचे मार्गदर्शनाखाली  पोलिस निरीक्षक बाबासाहेब ठोंबे, स.फौ.युनुस  शेख पो.हे .कॉँ. लक्ष्मण  महाले करीत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.