भुसावळात वकिलाच्या घरावर चोरी, ३० हजाराचा ऐवज लंपास

0

भुसावळ :- शहरातील वसंत टॉकीज पाठीमागील मेथाजी प्लॉट भागातील इमारतीत बंद घराला टार्गेट करून  अज्ञात चोरांनी केबलच्या साहाय्याने दुस-या मजल्यावर चढून घरातील अंदाजे 30 हजार रुपये रोख व भांडी तसेच अन्य वस्तू चोरून पोबारा केल्याची घटना आज गुरुवार रोजी उघडकीस आली .घटनेचे वृत्त कळताच शहर पोलीस कर्मचा-यांनी घटनास्थळी पाहणी केली .याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे .या घटनेमुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीती पसरली आहे

येथील वकिल अशोक लायवाला हे गेल्या 2 महिन्यापासून आपल्या कुटुंबियांसह बाहेर गावी गेलेले होते  दि  20 जून रोजी हे गावाहून परत आले असता त्यांना घराचे दार उघडे दिसले .त्यांनी त्वरित शहर पोलिसांना घडलेली माहिती दिली यावरून पोलिसांनी येऊन पाहणी केली असता घरातील केबल वायरीच्या साहाय्याने अज्ञात चोरांनी घराचे दार तोडून आत प्रवेश केला गच्चीवर एक 15 ते 29 किलो वजनाची सब्बल व एक पकड (सांडशी ) पोलिसांना आढळून आली .पोलिसांनी या वस्तू ताब्यात घेतल्या आहेत .

ऍड लायवाला यांच्या घरातील कपाटांमधील सामानाची उलथापालथ करून अंदाजे 30 हजार रुपये रोख व भांडी यासह अन्य वस्तू चोरी  चोरांनी करून पोबारा केला .  यापूर्वी सुद्धा याभागात चोरी झाल्याची चर्चा परिसरात होती तर ही चोरी दोन दिवसांपूर्वीच झाली असावी असा संशय व्यक्त करण्यात आला आहे

Leave A Reply

Your email address will not be published.