भुसावळात माजी उपनगराध्यक्ष यांच्या घरावर हल्ला

0

भुसावळ (प्रतिनिधी)– येथील माजी उपनगराध्यक्षा लक्ष्मी मकासरे यांच्या घरावर काही दहा ते पंधरा जणांनी रात्रीच्या सुमारास अंधाराचा फायदा घेत हल्ला चढवला. मात्र लक्ष्मी मकासरे व त्यांचा मुलगा राहुल यांनी स्वतःला घरात कोंडून घेत, शेजारच्यांना फोनवरून माहिती दिली असता परिसरातील नागरिक घराबाहेर जमा झाले. त्यामुळे हल्लेखोरांनी पळ काढल्याने पुढील अनर्थ टळला.

शहरातील समता नगर भागातील रहिवासी तथा नगरपालिकेच्या माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मी मकासरे आणि आरपीआय आठवले गटाचे उत्तर महाराष्ट्र अध्यक्ष रमेश मकासरे यांच्या घरावर काल (ता. २२) रात्री अकरा वाजेच्या सुमारास काही दहा ते पंधरा अज्ञात हल्लेखोरांनी हातात रॉड घेऊन हल्ला चढविला. घरात जाऊन या टोळीने साहित्याची तोडफोड केली. यावेळी रमेश मकासरे हे मुंबई येथे कामानिमित्त गेल्याने घरात लक्ष्मी मकासरे व राहुल मकासरे हे दोघेच होते. त्यांनी हल्लेखोरांच्या धाकाने आपला जीव वाचवत घरातील एका खोलीत स्वतःला कोंडून घेतले.

यानंतर त्यांनी शेजारील रहिवाशांना फोनवरून माहिती दिली असता, परिसरातील सर्व नागरिक धावपळ करत मकासरे यांच्या घराबाहेर जमा झाले. त्यामुळे हल्लेखोरांनी येथून पळ काढला. यानंतर पोलिसांना देखील पाचारण करण्यात आले असता, पोलिसांनी घरातील पाहणी केली. यासंदर्भात रमेश मकासरे यांच्याशी संपर्क साधला असता, आपण काही कामानिमित्त मुंबईला आहोत. या घटनेबद्दल रात्री माहिती मिळाली. मात्र हल्ल्यामागील उद्देश्य काय हे आपणास देखील ठाऊक नसल्याचे त्यांनी सांगितले. भुसावळ ला घरी परतल्यानंतर याविषयी माहिती घेऊन असेही ते म्हणाले. या घटनेबाबत पोलिस ठाण्यात नोंद करण्यात आली नव्हती.

Leave A Reply

Your email address will not be published.