भुसावळात पोलिसांना मास्क वाटप

0

पोलीस निरीक्षकांनी घेतली कर्मचाऱ्यांची काळजी

भुसावळ (प्रतिनिधी) : कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी या युद्धजन्य स्थितीत नागरिकांकरीता अहोरात्र आपली ड्यूटी बजावणाऱ्या व  काळजी घेणाऱ्या पोलिसांची सुद्धा आपण काळजी घेतली पाहिजे.  ही बाब प्रखरतेने लक्षात घेऊन येथील बाजारपेठ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दिलीप भागवत यांनी बाजारपेठ पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांना शुक्रवार २० मार्च रोजी मास्क वाटप केले.

बाजारपेठ पोलीस स्टेशनमध्ये नेहमी तक्रारदारांनी ये-जा सुरू असते.तसेच तक्रार देण्यासाठी होणाऱ्या गर्दीमुळे कर्मचाऱ्यांना कामकाज करावे लागते तर अनेकांना ड्यूटी बजावन्याकरीता बाहेर पडतात अश्या स्थितीत त्यांचे रक्षण व्हावे ही खबरदारी घेवून  कोरोना विषाणूंची लागण होऊ नये यासाठी बाजारपेठ पोलीस स्टेशनचे निरीक्षक दिलीप भागवत यांच्यावतीने लेखनिक हवालदार युवराज नागरुत यांच्या हस्ते  ८४ पोलीस कर्मचाऱ्यांना मास्क वाटप करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.