भुसावळातील युवकाची गळफास घेवून आत्महत्या

0

भुसावळ (प्रतिनिधी )- शहरातील शिवदत्त नगरातील रहिवासी तथा म्युनिसीपल हायस्कुलचे मुख्याध्यापक बी.वाय.सोनवणे यांचे चिरंजीव गौरव भानुदास सोनवणे (वय 26) या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना 15 रोजी दुपारी 2.40 वाजता राहत्या घरी घडली. या घटनेनंतर या परीसरात हळहळ व्यक्त करण्यात आली. तरुणाने आत्महत्या का केली? याचे कारण मात्र कळू शकले नाही.

आत्महत्येपूर्वी वडिलांशी संभाषण
आत्महत्या करण्यापूर्वी गौरव याने वडिलांना फोनवरुन आत्महत्या करीत असल्याचे कळविल्याची चर्चा आहे तर मुलाचा फोन आल्यानंतर वडिलांनी तातडीने घराकडे धाव घेतली. वडील घरात शिरण्यापूर्वीच काही क्षणापूर्वीच तरुणाने गळफास घेतल्याने त्यास शहरातील एका खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले मात्र तेथे सुविधा नसल्याने नातेवाईकांनी डॉ.उल्हास पाटील वैद्यकीय महाविद्यालयात हलविल्यानंतर वैद्यकीय अधिकार्यांनी त्याला मृत घोषित केले. याबाबात नशिराबाद पोलिसात वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीकांत जाधव यांच्या खबरीवरुन अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. मृतदेहाचे शवविच्छेदन जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयात करण्यात आले. दरम्यान, गौरवचे शिक्षण एमबीए झाल्यानंतर तो मुंबईत नोकरी करीत असल्याचे सांगण्यात आले. गौरव आत्महत्या का केली? याचे कारण कळू शकले नाही.

Leave A Reply

Your email address will not be published.