भुसावळची हॉट शहर म्हणून ओळख : तापमानाची चाळीशी कडे वाटचाल

0

भुसावळ –
उन्हाळ्याची चाहूल लागताच पहिले आठवण होते ती भुसावळ शहराची , मागिल अनेक वर्षांपासून भुसावळ शहराच्या तापमानाची राज्यात सर्वाधिक तापमान म्हणून नोंद झाली आहे. हॉटसिटीफ म्हणून प्रसिध्द असलेल्या भुसावळ शहरात मे हिटचा तडाखा मार्च महिन्यातच जानवू लागल्याने मागील विक्रमी नोंदि मुळे यंदाही तापमान वाढून कडक उन्हाळा जाणवेल काय अशी सर्वाना भीती आहे . शहराच्या तापमानाने चाळीसीकडे आपली वाटचाल सुरु केली आहे . दरम्यान, न.पा. दवाखान्यात उष्माघात कक्ष लवकरच सुर करण्यात येणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
येथील केंद्रीय जल आयोगाच्या नोंदीनुसार दि. 20 मार्च रोजी 39.9 अंश सेल्सीअस तापमान नोंद करण्यात आली आहे. उन्हाचा पारा दिवसेंदिवस वाढत असल्याने उकाळा असह्य होत तापमानात हळूहळू वाढ होत चालली असून 39. 9 अंशावर गेलेले तापमानात वाढ झाली असून आज दिनांक 25 मार्च शुक्रवार रोजी 40.2 अंश सेल्सिअस अशी नोंद करण्यात आली आहे .आद्रता वाढल्याने उकाड्यात वाढ झाली आहे या वाढलेल्या तापमानामुळे नागरिक घामाघूम होत आहे. मागील चार पाच वर्षापासून शहराच्या 47 -48 अशी विक्रमी नोंद कायम होत असते 48.5 अशी राज्यात विक्रमी नोंद झालेली आहे. यंदाही तापमान अशीच वाढ होत राहिली तर पुन्हा हे शहर तापमानाचा उचांक मोडेल कि काय अशी भीती शहर व परिसरातील नागरिकांना वाटू लागली आहे. कारण भुसावळ तालुक्यातील दीपनगर औष्णिक विद्युत केंद्रातील प्रकल्पातून 1000 मेगा वीज वाढली आहे तसेच राष्ट्रीय महामार्ग क्र. 6 च्या चौपदरी करणासाठी जवळपास तीन महिन्यात सुमारे 2000 पेक्षा जास्त वृक्षतोड झाल्याने सुद्धा तापमानावर परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
उष्णतेपासून दिलासा मिळण्यासाठी शहरासह परिसरात व महामार्गावर ठिक ठिकाणी थंड पेयांची दुकानेही सुरु झाली आहे. तेथेही नागरिकांची गदी दिसून येत आहे तपमानापासून स्वरक्षणासाठी नागरिक खबरदारी म्हणून डोक्यास रुमाल डोळ्यांना गारवा मिळावा यासाठी गॉगल्स, कॅप, बागायती रुमाल यांचा वापर करताना दिसून येत आहे तर तरुणी स्कार्फ व सनकोट चा वापर करीत आहे बाजारात कुलर, वातानुकुलीत यंत्र(ए.सी), पंखे ,वाळ्याच्या ताट्या ,थंडगार पाण्यासाठी वाळा , खस ,विवीध रंगबेरंगी सरबत प्रकार,आदी उन्हापासून गारवा देणार्‍या विक्रीस उपलब्ध झाल्या असून नागरिकांचा या विविध वस्तू खरेदीकडे कल वाढताना दिसून येत आहे.
नुकत्याच बारावी व दहावीच्या परीक्षा संपल्याने युवावर्गाची गर्दी शहरातील विविध आईस्क्रिम पार्लर ,रसवंती,बर्फाचा रंगिबेरंगी गारेगार गोळा विक्रेत्यांच्या गाडीवर ,मावा कुल्फी ,कोल्ड्रिंक सेंटर ,आदी ठिकाणी दिसत दिसत आहे. तर भाजी बाजारात संत्री ,द्राक्ष ,टरबूज, खरबूज,काकडी,या देणार्‍या मागणी वाढली आहे . अनेक लहानमोठ्या दुकानदारांनी आपल्या दुकानांना हिरव्या रंगाच्या कापडाचे शेड बांधले तर अनेकांनी दुकानासमोरील रस्त्यावर हिरवे कापड बांधून ग्राहकांची सोय केली आहे.
गरीबांचा फ्रीज म्हणून ओळखल्या जाणारा काळा माठ व रांजणाची मागणी वाढली असून सुमारे 70 रुपयां पासून ते 300 रुपयां पर्यंत हे माठ झाले आहेत. उन्हाच्या चटके जाणवू लागल्याने दुपारी बारा वाजेपासूनच रस्ते ओस पडू लागले तर सायंकाळी सहा नंतर पुन्हा रस्त्यांवर गजबजू लागत आहे. शहरातील श्यामाप्रसाद मुखर्जी उद्यानात ,संध्याकाळी आबालवृद्ध गर्दी करू लागले आहे. शहर व परिसरातील या वाढत्या तापमानामुळे मार्च महिना जरी 40 अंशावर स्थिरावला असला तरी एप्रिल ,व कोणता उच्चांक मोडून अशी भीती नागरिकांना वाटू लागली आहे . यंदा उन्हाच्या चटक्यांसोबत पाणी टंचाई सारख्या भिषण समस्येला सूद्धा नागरिकांना सामोरी जावे लागणार असल्याची शक्याता नाकारता येत नाही .
उपाशी पोटी बाहेर पडू नका डॉक्टरांचा सल्ला
उन्हात जाणे टाळा- दरम्यान, वाढत्या तापमानामुळे नागरिकांनी दुपरच्या उन्हात जाणे टाळावे. उपाशी घराबाहेर पडून येथे. बाहेर पाण्याची बाटली सोबत ठेवावी. उघड्यावरील खाद्य पदार्थ खाऊ नये. उन्हात जातांना डोक्याला रुमाल बांधावा दुपारी कामे टाळावी. वयस्कर, बालके, गर्भवती महिला, मधुमेह व ह्ृदयरोगाच्या रुग्णांनी शक्यतो उन्हात जाणे टाळावे व भरपूर पाणी प्यावे असा सल्ला न.पा. वैद्यकिय अधिकारी किर्ती फलटणकर यांनी दिला. दरम्यान आगामी पाहता न.पा. दवाखान्यात लवकरच उष्माघात सुर करण्यात येणार आहे. कक्षातील कुलर, पंखे, वाटर कुलर सुर करण्यात आले न.पा. दवाखान्या उष्माघात तसेच उन्हाळ्यातील आजारांची औषधी उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.