भालशिव व पिंप्री येथे महर्षी वाल्मिक जयंती उत्साहात साजरी

0

यावल, दि . २९ –

तालुक्यातील भालशिव व पिंप्री येथे महर्षी वाल्मिक यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. दोन्ही गावात या निमित्ताने यावलचे नगरसेवक डॉ. कुंदन फेगडे यांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले प्रसंगी महर्षींच्या जयंती निमित्त डॉ. फेगडे यांनी गावातील महर्षी वाल्मिक जयंतीच्या उत्सव समितीला प्रभु श्री रामचंद्र यांची प्रतिमा भेट म्हणुन दिली प्रसंगी उत्सवात धर्म संस्कृतीचा विसर तरूणांना पडायला नको अशी भावना ठेवत विविध मंडळांना डॉ. फेगडे यांनी श्रीरामांच्या प्रतिमा भेट दिल्या आहेत त्यांच्या या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत असुन गावातील उत्सव समिती कडून देखील आभार व्यक्त करण्यात आले प्रसंगी भालशिव येथे रोहिदास कोळी पंढरी कोळी, लक्ष्मण कोळी, वासुदेव कोळी, दिलीप कोळी, वसंत कोळी, सुभाष कोळी, ईश्वर कोळी,
मोहन कोळी, विजय कोळी, राजेंद्र कोळी, सागर कोळी, जितेंद्र कोळी, धनराज कोळी, सागर कोळी, राहूल भोई, सोनु कोळी, सतीष भोई आदींची उपस्थिती होती.

Leave A Reply

Your email address will not be published.