भातखंडे माध्यमिक विद्यालय १००% तंबाखूमुक्त शाळा

0

भातखंडे प्रतिनिधी  : भातखंडे माध्यमिक विद्यालयाने प्राथमिक व माध्यमिक शिक्षण संचालनालय व सलाम मुंबई फाऊंडेशन  द्वारा  तंबाखू मुक्त शाळा अभियानाअंतर्गत  भडगाव तालुक्यातील कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या माध्यमिक विद्यालय ते सहभाग  घेऊन  भातखंडे माध्यमिक विद्यालय 100%  तंबाखू मुक्त शाळा झाली असून  यासाठी  खालील प्रमाणे तंबाखू मुक्त शाळेचे ११ निकष लावले

१)शाळेच्या परिसरात तंबाखू वापरास प्रतिबंध असणे.

वरील आशयाची मुख्याध्यापकांनी काढलेली नोटीस चा फोटो.

निकष २)तंबाखू नियंत्रण समितीची स्थापना करणे.

वरील समितीची स्थापना करून समिती दर्शक व समितीच्या सभेचा फोटो(वेगळी समिती स्थापन करायची नसल्यास शाळा व्यवस्थापन समितीलाच तंबाखू नियंत्रण समिती म्हणून घेता येईल .सभा इतिवृत्त रजिष्टर मध्ये तसा ठराव घ्यावा.)

निकष ३)”धुम्रपान आणि तंबाखूचा वापर करणे हा एक गुन्हा आहे”,असे नमूद असणारे फलक शाळेमध्ये आणि शालेय परिसरात असणे.

वरील मजकूर असणारा फलक शाळेच्या आवारात लावून शाळेतील प्रतिनिधीसह काढलेला फोटो अपलोड करावा.

निकष ४)शाळेमध्ये तंबाखूचे दुष्परिणाम आणि तंबाखू नियंत्रण कायद्याबाबत पोस्टर्स लावणे.

वरील आशय आणि मजकूर असणारे पोस्टर्स शाळा मुख्याध्यापक प्रतीनिधीसह, फोटो अपलोड करणे.जुनी मासिकेआणि वर्तमानपत्रातून योग्य ती चित्रे कापून यासाठी वापरता येतील.

निकष ५)तंबाखूविरोधी संदेश शालेय साहित्यांवर चिकटवणे

तंबाखूविरोधी संदेश असणाऱ्या पट्ट्या  शालेय साहित्य ,कार्यालयीन अभिलेखांवर चिकटवणे.विद्यार्थी त्यांच्या स्वतः च्या पाठ्यपुस्तके व वह्यांवर संदेश लिहू शकतात.

निकष ६)COPTA २००३ कायद्याची एक प्रत शाळेच्या मुख्याध्यापकाकडे उपलब्ध असणे

सदर कायद्याची प्रत सोबत असणारा शाळेच्या मुख्याध्यापकाचा फोटो

निकष ७)शाळांनी , राज्याने नियुक्त केलेल्या नोडल ऑफिसर किंवा जिल्हा-तालुका आरोग्य अधिकारी ह्यांचा सल्ला व मदत घेणे

नोडल ऑफिसर किंवा संबधित अधिकारी ह्यांना तंबाखू मुक्त शाळा घोषित करण्यासंदर्भातील अडचणीसाठी मदत मागणारे पत्र किंवा इ-मेल .

निकष ८)शाळेच्या नियमित आरोग्य उपक्रमांमध्ये तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचा समावेश करणे

तंबाखूचा वापर आणि बिघडलेले आरोग्य यामधील संबंध ,स्वच्छता आणि पोषण यांवरील सत्र तसेच आरोग्य शिबीर ,मौखिक तपासणी किंवा डेंटल शिबीर आयोजित करण्यासाठी स्थानिक डॉक्टर,डेंटिस्ट,डेंटल हॉस्पिटल ह्यांना आमंत्रित करणे.

निकष ९)शाळेपासून १०० गज (यार्ड)क्षेत्रामध्ये तंबाखू उत्पादनांच्या विक्रीवर पूर्ण बंदी असणे आणि त्या अनुषंगाने फलक असणे.

शाळेबाहेर खुणेचा फलक आणि शाळेजवळील तंबाखू विक्रेत्यांना पत्र.

निकष १०)तंबाखू नियंत्रण उपक्रमांमध्ये ज्या विद्यार्थी, शिक्षक किंवा मुख्याध्यापकांनी प्रयन्त केले आहेत त्यांची दखल घेऊन त्यांचा सत्कार करणे.

संबंधित व्यक्तींचा सत्कार असणारे फोटो.

निकष ११) “आमची शाळा- तंबाखू मुक्त शाळा” असल्याचा फलक शाळेच्या प्रवेश दाराजवळ असणे

वरील मजकूर असणारा फलक

 

वरील सर्व निकषांचे पुरावे असणारे फोटो app वर अपलोड केलेत

शाळा 100% तंबाखू मुक्त शाळा करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक आर एस पाटील सह शाळेतील सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Leave A Reply

Your email address will not be published.