भातखंडे परिसरातील अवैध वृक्षतोड थांबवा

0

भातखंडे(प्रतिनिधी) : वृक्ष लागवडीसाठी शासन मोठ्या प्रमाणावर दरवर्षी नियोजन करीत असते त्यावर मोठ्या प्रमाणात खर्च देखील होत असतो. असे असले तरी जी मोठ मोठी वृक्ष झालेली आहेत. त्याचे संगोपन होताना दिसून येत नाही असे म्हणतात “वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे” परंतु वृक्षांचे संरक्षण होण्याऐवजी त्याची कत्तल होत असताना मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.

यासाठी त्यांना कोणाचातरी आशीर्वाद असल्याशिवाय हे होत नाही असे दिसून येते. असाच काहीसा प्रकार भातखंडे सह परिसरात अवैद्य वृक्षतोड होताना दिसून येत आहे ही अवैध वृक्षतोड कोणाच्या आशीर्वादाने होत आहे. हे पाहणे गरजेचे असून अवैध वृक्षतोड थांबली पाहिजे याबाबत वनविभागाने कटाक्षाने लक्ष घालून अवैध वृक्षतोड थांबवून याला आळा बसला पाहिजे. अशी अपेक्षा परिसरातील वृक्ष प्रेमींनी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.