भातखंडेचे माजी सैनिक कैलास महाजन यांनी वाचविला एकाचा प्राण

0

भातखंडे (प्रतिनिधी) असे म्हणतात आरोग्य सेवा हीच खरी ईश्वर सेवा या उक्तीप्रमाणे ज्यांनी अतिशय नाजूक प्रसंगी सापडलेल्या युवकाला आरोग्य सेवा दिली ते कर्मवीर तात्यासाहेब हरी रावजी पाटील किसान शिक्षण संस्थेच्या भातखंडे माध्यमिक विद्यालयाचे माजी विद्यार्थी तथा माजी सैनिक कैलास शिवराम महाजन यांना अलीकडेच एक प्रसंग आला कैलास महाजन हे सकाळी ८.३०च्या सुमारास साधारण २५ ते २६ वर्षांचा तरुण मुलगा कैलास महाजन यांना भेटला आणि म्हणाला काका माझी छाती दुखतेय. यावर मी त्याला तात्काळ म्हटले की, तू अगोदर हॉस्पिटलला जा. येथून दोन किलो मीटरवर हॉस्पिटल आहे. तेथे तुझी तब्बेत दाखव मग घरी जा. तो थोडा दूर गेला. थांबला. छाती चोळू लागल्या. नंतर त्याने रोड क्रॉस केला. आणि तो खाली पडला.

मी माझ्या सहकाऱ्याला पाठवल. पण, तो पर्यंत तो बेशुद्ध झाला होता. त्याने मला आवाज दिला. मी पडत त्याच्याकडे गेला. त्याचा श्वास थांबल्या सारखा वाटत होता त्याचे नाडीचे ठोके देखील जाणवत नव्हते. त्याला तात्काळ त्याला सि पी आर चालू केला. त्याने प्रतिसाद नाही दिला. मी तरी सुद्धा चालूच ठेवला. आणि तो पर्यंत माझ्या सहकारी मित्राने ॲम्बुलन्स बोलावली. तीस-चाळीस सेकंदांनी शॉक लागावा तसा तो ओरडत एकदम उठून बसला व पुन्हा खाली पडला. सुदैवाने त्याचा श्वास चालू झाला होता. त्याचे पंपिंग चालूच ठेवले ताबडतोब तेथे अंबुलन्स आली. त्याला अंबुलन्स मध्ये टाकले पण तो पर्यंत त्याने मान टाकून दिली होती.डोळे माथ्यावर चढवून दिलें होते.त्याला सि पी आर चालूच ठेवला. कोरोणाची भीती मनात होती तरीही त्यांनी मरणाची भीती न बाळगता त्याला तोंडाने श्वास द्यायचे ठरविले. तो पर्यंत त्याचा श्वास पुन्हा चालू झाला. सुदैवाने हॉस्पिटल जवळच होतं. हॉस्पिटलमध्ये सर्व कर्मचारी तयार होते. तात्काळ त्याला ऑक्सिजन लावला. तो १५ मिनिटात नॉर्मल झाला. पण त्याला हृदयामध्ये प्रॉब्लेम असल्याचे निदर्शनास आले. सध्या ठीक आहे. डॉक्टरांना जेव्हा हे कळलं तेव्हा ते मला म्हणाले की तुम्ही खूप महत्त्वाचे काम केलाय आज. तुमच्या मुळे याचा जीव वाचला. तुमच्या हातात फक्त एक मिनिट होता. आणि तो तुम्ही योग्य पणे उपयोग केला. तुमच्या ह्या कार्याला सलाम हे एका डॉक्टराचे ऐकून ते भारावून गेले.

पण मी फक्त आणि फक्त कर्तव्य केले. तो माझ्यामुळे नाही तर देवाच्या कृपेने वाचला. माझी फुशारकी म्हणुन मी तुम्हाला हे सांगत नाही. हे कस झाल हे पण मला माहीत नाही. मी आर्मी थोड फार या बद्दल शिकलो होतो. आणि यू ट्यूब वर या बद्दल डिटेल्स मध्ये पाहिलं होत. म्हणून आज कुणाच्या ते कामी आल. आई-वडिलांनी केलेले संस्कार व शिक्षकांनी केलेले अनमोल मार्गदर्शन यातूनच मी ही कृती करू शकलो असे त्यांनी प्रस्तुत प्रतिनिधी जवळ बोलताना सांगितले. आपल्या गावाच्या माजी सैनिकाने केलेल्या धाडसी आरोग्य सेवेबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत असून त्यांचे अभिनंदन होत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.