भडगाव तालुक्यात गिरणा- तितूर पात्रातून सर्रास अवैध वाळू उपसा सुरू

0

भडगाव (सागर महाजन) : जळगाव जिल्ह्याला वरदान ठरलेली व भडगाव तालुक्याला सुजलाम सुफलाम करणारी गिरणा नदी पात्रातून सर्रास अवैध वाळू वाहतूक सुरू आहे. दररोज रात्री ढंपर, जे.सी.बी.,ट्रॅक्टर द्वारे वाळू वाहतूक सुरू आहे. या अवैध वाळू वाहतुकीवर प्रशासन कठोर कार्यवाई करणार की, वस्त्रहरण सुरूच राहणार असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

भडगाव तालुक्याला सुजलाम सुफलाम जिच्या अमृतामुळे होते त्या गिरणा पात्रातून दररोज रात्री ढंपर, जे.सी.बी.,ट्रॅक्टर द्वारे सर्रास अवैध वाळू उपसा सुरू आहे. तालुक्यातील टोंनगाव,भडगाव,बांबरुड महादेवाचे, तसेच गिरणा व तितूर नदी संगम जवळ या गावातील नदी पात्रातून दररोज रात्री बेसुमार वाळू उपसा सुरू आहे. या बाबत महसूल प्रशासन कार्यवाहीचा बडगा का उचलत नाही असा प्रश्न सुज्ञ नागरिकांकडून उपस्थित होते आहे.

भडगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिरी जवळून वाळू उपसा

भडगाव शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या विहिर व पंपिंग हाऊस जवळ वाळू माफियानी अवैध वाळू उपसा सुरू आहे. या विहिरी जवळून जर असाच उपसा सुरू राहिला तर भविष्यात शहरात पाण्याचा प्रस्न उद्भवणार आहे. यावर नगरपालिकेने तत्काळ लक्ष देऊन वाळू उपसा करणाऱ्यांवर कार्यवाई करावी. व शहराला भीषण पाणीटंचाई पासून दूर करावे. तसेच नगरपालिका चे शहरात विकास कामे सुरू असतात त्या ठिकाणी वाळू टाकण्यासाठी महसूल कडून काही ब्रास चे चलन काढले असते परंतु या एका चलनावर बऱ्याच प्रमाणावर दिवसा ट्रॅक्टर वर वाळू उपसा सुरू असतो. या मुळे विकास कामावर कमी परंतु अवैध वाळू जास्त वाहिली जाते.

गिरणा- तितूर नदी संगम जवळ रात्री दोन जे.सी.बी. पन्नास ट्रॅक्टर अवैध वाळू उपसा

गिरणा- तितूर नदी संगम जवळ टोंनगाव, बांबरूड, महादेवाचेबांबरूड या शिवारातील नदी पात्रातून रात्री दोन जे.सी.बी.पन्नास ट्रॅक्टर अवैध वाळू उपसा सुरू आहे. या बाबत गेल्या आठवड्यात एक ट्रॅक्टर पकडले होते. पुन्हा येथून वाळू माफियानी

दोन जे.सी.बी. पन्नास ट्रॅक्टर अवैध वाळू उपसा करून तो थप्पा एका जागी मारून या ठिकाणावरून ढंपर द्वारे मुंबई, पुणे, चाळीसगाव, मालेगाव, पाचोरा, या शहरात पाठवले जाते. या ठिकाणी पाचोरा प्रांत यांनी तत्काळ लक्ष देऊन कारवाई करावी. व अवैध वाळू उपसा बंद करावा. अशी मागणी होत आहे.

भडगाव शहरात ठीक ठिकाणी वाळूचे मोठे थप्पे

प्रशासनाच्या लक्षात येऊ नये म्हणून नदी पात्रातून रात्री ट्रॅक्टर द्वारे वाळू उपसा करून ही वाळू एका जागी जमा करून थप्पा मारला जातो. व ती वाळू ढंपर द्वारे रवाना केली जाते. अश्या प्रकारे वाळू वाहतूक होत आहे. तसेच ठीक ठिकाणी वाळूचे थप्पे आहेत त्या जागी महसूल विभागाने लक्ष देऊन कारवाई करावी.

Leave A Reply

Your email address will not be published.