भडगावात आमदार किशोर पाटील यांंनी घेतली कोरोना बाबत बैठक

0

भडगाव | प्रतिनिधी

ग्रामीण भागात  कोरोना बाबत काहीच गांभीर्य नाही. तरी ग्रामीण भागातही ग्रामस्तर समिती स्थापन करावी. काही ग्रामसेवक, तलाठी  गावात थांबत नाही. अशांना नोटीसा दया. त्जिवनावश्यक  दुकानांचे काही दुकानदार नियमीत दरापेक्षा जादा दराने विक्री  करीत आहेत. अशा!दुकानदारांवर कार्यवाही करा . असा आदेश व सुचना  यावेळी पाचोरा भडगावचे आमदार किशोर पाटील यांनी केले.ते कोरोना  उपाय योजना बाबत भडगाव तहसिल कार्यालयात  आयोजीत बैठकीत मार्गदर्शन करतांना बोलत होते. ही बैठक दि. २५ रोजी सकाळी ११.३० वाजता पार पङली. या बैठकीस तहसिलदार माधुरी आंधळे, पोलीस निरीक्षक धनंजय येरुळे, नगराध्यक्ष अतुल पाटील,  माजी जि.प.सदस्य विकास पाटील, नगर परीषदेचे मुख्याधिकारी विकास नवाळे, गटविकास अधिकारी अतुल पाटील ,निवाशी नायब तहसिलदार रमेश देवकर,तालुका आरोग्य अधिकारी ङाॅ. सुचिता आकडे, भडगाव ग्रामिण रुग्णालयाचे वैदयकीय अधिकारी डॉ. पंकज जाधव, कजगाव प्राथमिक आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी डॉ. प्रशांत पाटील, सोमनाथ पाटील, केंद्र प्रमुख रविंद्र सोनवणे, माजी नगराध्यक्ष शशिकांत येवले, माजी उपनगराध्यक्ष डॉ.वसीमबेग मिर्झा, माजी नगरसेवक डॉ. विजयकुमार देशमुख, स्विकृत नगरसेवक डॉ.प्रमोद पाटील, डॉ. विवेक भावसार, मंडळ अधिकारी बी. ङी. पाटील, टोणगाव तलाठी राहुल पवार इतर अधिकारी यांचेसह शहरातील डॉक्टर, ग्रामसेवक आदि मोठया संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार किशोर पाटील यांनी सांगीतले कि, शहराप्रमाणेच तालुक्यातही कोरोना बाबत जनजागृतीसह उपाय योजनाकामी नियोजन करा. ग्रामस्तरावर ग्राम  समिती स्थापन करा. बाहेरुन गावात आलेल्या व्यक्तींची यादी तयार करा. त्यांची आरोग्य तपासणी करा.  सोशलमिडी यासोबतच गावांमध्ये अफवा पसरविणार्यांवर कायदेशीर कार्यवाही करा. अधिकार्यांनी जबाबदारी पाळावी. जे तलाठी, ग्रामसेवक गावात राहत नाहीत त्यांना नोटीसा दया. कार्यवाही करा. गावांमध्ये प्रबोधन करावे. नागरीकांची भिती दुर झाली पाहीजे. आरोग्य विभागाने बाहेरगावाहुन आलेल्या नागरीकांची तपासणी करावी. अशा सुचनाही उपस्थित अधिकांना दिल्या आहेत.  रस्त्यावर मोकाट फिरणार्यांना बिनधास्त ठोका, त्यांची गय करु नका.  असा आदेश पोलीस प्रशासनास दिला. अधिकार्यांंनी सुचनांचे आदेशांचे पालन करावे अशा सुचनाही आमदार किशोर पाटील यांनी दिल्या. तहसिलदार माधुरी आंधळे यांनी सांगीतले कि, शहरात चांगली यंञणा सुरु आहे. तालुक्यात ग्राम समित्या स्थापन कराव्यात. नागरीकांनी सहकार्य करावे . असे सांगीतले.शहरातही विविध भागांमध्ये ग्रामसमित्या स्थापन कराव्यात अशी मागणी पत्रकार सागर महाजन यांनी मांडली त्यावर आमदार किशोर पाटील यांनी अधिकार्यांना याबाबत निर्णय घ्यावा अशा सुचना केल्या. संतोष महाजन यांनी यशवंतनगर सह भागांमध्ये गोरगरीबांना या काळात योग्य रेशनधान्य देण्यात यावे अशी मागणी मांङली. त्यावर आमदार किशोर पाटील यांनी याबाबत तहसिलदार माधुरी आंधळे यांना सुचना केल्या. व नागरीकांना २ ते ३ महीन्याचा धान्य साठा दयावा. कोणीही धान्यापासुन वंचित राहणार नाही. याबाबत  आपण हा विषय   जिल्हयाचे पालकमंञी ना. गुलाब पाटील व मुख्यमंञी उद्धव ठाकरे यांचेकङे हा विषय मांङु .असे सांगीतले. तसेच माजी जि. प. सदस्य विकास पाटील यांनी  कोरोना बाबत दुर्लक्ष होत असल्याचे मांडत  गावात बाहूरगावाहुन आलेल्या आपण आपल्या नातेवाईंकांची स्वता तपासणी करुन घ्यावी.  प्रत्येकाने मास्क व हॅण्ङ ग्लोज वापरावे असे सांगितले. तसेच बाहेरगावाहुन गावागावात आलेल्या नागरीकांची आरोग्य विभागाने तपासणी करावी. आतापर्यत तालुक्यात किती तपासण्या झाल्या असा प्रश्न अशोक परदेशी यांनी उपस्थित केला असता तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुचिता आकङे यांनी माहीती दिली कि. आतापर्यंत तालुक्यात एकुण १४३५ जणांची तपासणी करण्यात आली व हे तपासणीचे कामही  जनजागृतीसह सुरु आहे असे सांगीतले. भङगाव ग्रामिण रुग्णालयात एकुण २०० जणांची आतापर्यंत तपासणी झाल्याची माहीती वैदयकीय अधिकारी डॉ. पंकज जाधव यांनी दिली. पुढे अशोक परदेशी यांनी मांङले कि, शासन, प्रशासन म्हणते घरातच बसा घराबाहेर निघु नका. लोक घरातच थांबत आहेत. दुसरीकङे काही गावागावांमध्ये दिवसभर तर कधी राञी गावाचा विज पुरवठा बंद करण्यात येतो.  त्यात तापमान जादा आहे, याचा ञास नाघरीकांना सहन करावा लागत आहे. तर हा विज पुरवठा दिवसा व राञीही सुरळीत देण्यात यावा. नागरीकांचा ञास थांबवावा असे मांङले यावर आमदार किशोर पाटील यांनी विज वितरणच्या अधिकार्यांना तशा सुचना करा. अशा सुचना तहसिलदार माधुरी आंधळे यांना दिल्यात. तसेच महींदळे गावात महीन्यापासुन पाणी पुरवठा होत नाही.इलेक्टीृक वस्तुंअभावी बंदमुळे पाणी पुरवठा कामी ईलेक्टीृक दुकान साहीत्यासाठी परवानगी दया असे आमदारांनी या वेळी सांगीतले. भाजपा  माजी तालुकाध्यक्ष सोमनाथ पाटील यांनी मांडले की भडगाव तालुक्यात व शहरात मुंबई, पुणे, विदेश येथून आलेल्या नागरिकांची तपासणीसाठी हातावर जो शिक्का मारतात तो अद्याप भडगाव येथे आलेला नाही. तो आणून बाहेर गावाहून येणाऱ्यांची तपासणी करावी व त्यांना 14 दिवस होम कॉरिडॉर ठेवावे ते बाहेर दिसल्यास कार्यवाही करावी यामुळे जास्त संसर्ग होणार नाही यावर डॉ. सुचिता आकडे यांनी लवकरच शिक्का व शाई मागवण्यात येईल असे सांगितले.

Leave A Reply

Your email address will not be published.