भटक्या समाजातील मुलगा बनला एम. एस. (अर्थो)डॉ. प्रदीप जाधव

0

भातखंडे (प्रतिनिधी) : जिद्द मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर मनुष्य आपले यश संपादन करू शकतो. असेच काहीसे उदाहरण मूळचे वसंत नगर पिंपळकोठा तालुका पारोळा येथील रहिवासी हल्ली मुक्काम पाचोरा आदर्श नगर मधील स्वर्गीय गोवर्धन जाधव हे वास्तव्यास आले होते त्यांच्या दुःखद निधनानंतर त्यांची धर्मपत्नी उषा गोवर्धन जाधव यांनी त्यांच्या मृत्यूनंतर पुढील संसाराचा गाडा पुढे हाकलला या विधवा महिलेचा मुलगा प्रदीप गोवर्धन जाधव याचे प्राथमिक शिक्षण व माध्यमिक शिक्षण पाचोरा येथे झाले.

दहावीला पि के शिंदे विद्यालयात होता. तर बारावीला एम एम कॉलेज महाविद्यालयात शिकला सुरुवातीपासूनच तो कुशाग्र बुद्धिमत्तेच्या विद्यार्थी  घरची परिस्थिती अत्यंत गरीब असल्यामुळे अत्यंत काटकसरीने जीवन जगत होता आपल्याला एकांतात अभ्यास करायला मिळावा म्हणून कॉलनी मधील घर बंद असलेल्या पोर्च मध्ये शांत वातावरणात नेहमीच अभ्यास करणे पसंत केले कारण घरात आई उदरनिर्वाहासाठी  कुटुंबाला मदत व्हावी म्हणून शिवणकाम करणे व पिठाची गिरणी चालवणे अशी काम करावे लागत असल्याने अभ्यासात व्यत्यय येत असल्याकारणाने निर्जन स्थळी अभ्यास करणे अधिक पसंत केले. परिस्थिती अत्यंत हलाखीची असल्याने वडील गोवर्धन जाधव  यांना कंडक्टरची नोकरी पगार जमतेम आपल्या मुलाला चांगले शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी काबाडकष्ट केले अशा  परिस्थितीत दोन मुले एक मुलगी पत्नी यांचे पालन-पोषण शिक्षण आधार पण अशा अनेक गोष्टी त्यांच्या समोर होत्या मोठे ध्येय कसे साध्य करायचे हा यक्ष प्रश्न प्रदीप जाधव समोर नेहमी सतावत होता  वडिलांनी बारावी सायन्स नंतर परिस्थितीचा आवाका बघून बी फार्मसी कॉलेज कराड याठिकाणी प्रवेश निश्चित करून टाकला परंतु प्रदीपला आपण विहिरीत ढकलून आलो असे त्यांच्या वडिलांना सारखे वाटत होते त्यातही त्या ठिकाणी डॉ. प्रदीप यांचे मन  लागत नव्हतं. मेडिकल च्या सीईटी मध्ये चांगले मार्क होते. तरी त्या वर्षी मेडिकल ला नंबर लागला नाही पुन्हा रिपिट केले आणि  पंधरा ते सतरा तास दररोज अभ्यास केला आणि मेडिकलची सीईटी दिली.

यासाठी जळगावला सुमन दीप क्लासेस हरीश पाटील यांच्याकडे क्लासेस लावले परंतु क्लासेसची फी भरण्यासाठी सुद्धा पैसे नव्हते क्लासेसचे संचालक हरीश पाटील सर यांना विनवण्या करून क्लासेस जॉईन केले पाचोरा ते जळगाव रोज ये जा त्यात स्टेशन ते क्लासेस रोज पायीजाणे रिक्षा भाडे साठी पैसे राहत नव्हते आणि मात्र त्या वर्षी चांगल्या मार्कांनी मेडिकल की सिईटी पास झाला आणि एमबीबीएसला बीजे मेडिकल कॉलेज ससून जनरल हॉस्पिटल मुंबई याठिकाणी नंबर लागला दुसऱ्या वर्षी शिकत असताना असतानाच वडील गोवर्धन जाधव यांचा दुर्दैवी मृत्यू झाला यानंतर संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी विधवा आई उषा जाधव मोठे बंधू मेघराज जाधव यांनी  वडिलांची जागा घेतली आणि स्वतःच्या शिक्षणाचा  त्याग करून   लहान भावाचे अर्थात डॉक्टर प्रदीप जाधव यांचे शिक्षण पूर्ण केले. यासाठी त्यांचे मामा अशोक साईदास चव्हाण माध्यमिक शिक्षक यांची देखील खंबीर साथ/ मार्गदर्शन त्यांना लाभले पुढे एमबीबीएस पूर्ण झाल्यानंतर मेडिकल ऑफिसर म्हणून बोदवड व संगमनेर साकुर याठिकाणी केले. नंतर एम एस साठी सि ई टी दिली त्यात सि ई टी रँक ऑल इंडिया रँक १८०० महाराष्ट्रातून ३२९ वि जे ४ मिरीट लिस्ट मध्ये आला त्यात एम एस (अर्थो) साठी सि ई टी दिली त्यात जीएस मेडिकल कॉलेज मुंबई या ठिकाणी नंबर लागला आणि आता अलीकडेच एम एस (अर्थो )हा वैद्यकीय व्यवसायाचा अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला याचा सार्थ अभिमान त्यांच्या सर्व नातेवाईक आप्तेष्ट मित्रांना वाटत त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत असून आत्ता ते त्याच ठिकाणी ते स्थिर-स्थावर झालेला आहे. शेवटी बोलताना ते म्हणाले माझे स्वर्गीय वडील गोवर्धन जाधव मातोश्री, माझे वडील बंधू व माझे मामा यांनी सर्व केलेल्या मेहनतीचे फळ मला मिळाले असून भविष्यात गोरगरीब रूग्णांसाठी मी सदैव धावून जाईल असे त्यांनी शेवटी बोलताना प्रस्तुत प्रतिनिधी जवळ सांगितले*

Leave A Reply

Your email address will not be published.