बौध्द समाज मेळाव्यात शंभर विवाहेच्छुकांनी दिला परिचय

0

जळगाव दि.25:-
जाणिव परिवार व दर्पण संस्थेतर्फे बालगंधर्व नाट्यगृहात बौध्द समाज वधूवर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते.या मेळाव्यात जवळ जवळ शंभर विवाहेच्छुकांनी परिचय करून दिला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उषा वाघ होत्या तर प्रमुखपाहुणे म्हणून अ‍ॅड.सी.बी.वाघ, सपकाळे,आोक बाविस्कर,दीनकर अडकमोल,विश्वास बिर्‍हाडे,अनिल बागूल, रेखा हिवरे,सुधा वाघ, चंद्रकांत सदानशिव, नलिनी सदानशिव,भास्कर वानखेडे यासह आदी मान्यवर उपस्थित होते.
प्रारंभी दर्पण संस्थेचे अध्यक्ष युवराज वाघ यांनी प्रास्ताविकात संस्थेची माहिती विशद केली. त्यात त्यांनी बौध्द समाज वधू-वर परिचय मेळावा आयोजित करण्यामागची भूमिका व आतापर्यंत केलेल्या कार्याचा सविस्तर आढावाही मांडला. यावेळी मुकूंद सोनवणे यांनी समाजाच्या विविध घयकांवर प्रकाश टाकला. यात त्यांनी जोडीदार कसा निवडावा, याविेषयीही मार्गदर्शन करण्यात आले. तसेच यावेळी चंद्रकांत सदानशिव लिखित अभिव्यक्ती या कविता संग्रहाचे प्रकाशन करण्यात आले. डी.बी. हिवरे यांनी बुध्द वंदना सादर केली. विलास यावलकर यांनी सूत्रसंचालन केले. ्र आभारप्रदर्शन आंचल वाघ यांनी केले.
कार्यक्रमाचे चोख नियोजन सोनवणे, दिलीप पाटील, अरूण वाघ,उमेश तायडे, विजय म्हस्के यांनी केले. उपवर वधू-वरांचे मनोगतं- या कर्यक्रमातच उपवर वधूंनी समजूतदार व दोघांना सारखा दर्जा देणारा समंजस जोडीदार असावा, अशी तर उपवर वरांनी सर्वांना सोबत घेवून चालणारी, सुसंस्कृत, सुसंस्कारीत जोडीदार असावा, आशा अपेक्षा व्यक्त केल्या. तसेच यावेळी… जाण … या सूचीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. या सूचीत उपवर वधू-वरांचा सविस्तर परिचय देण्यात आला आहे. ही सूची अनेक समाज बंधू-भगिनींसाठी उपयुक्त ठरणार असून विवाह जुळविण्यासाठी फार मोठी मदत याव्दारे होणार असल्याची भावना उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केली.

Leave A Reply

Your email address will not be published.