बोदवड शहरातील प्रभाग क्रं ५ मध्ये घाणीचे साम्राज्य !

0

नागरिकांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

बोदवड (प्रतिनिधी) – शहरातील प्रभाग क्रं ५ मधील मटन मार्केट परिसरात घाणीचे साम्राज्य असून येथील नागरिकांना आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

गेल्या काही दिवसांपासून येथील परिसरात सर्वत्र घाणीचे साम्राज्य असून या घाणीच्या साम्राज्यामुळे डासांची उत्पत्ती वाढली असून याकडे नगर पंचायतीचे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे.याचं ठिकाणी मटन मार्केट असल्याने येथे कायम अस्वच्छता दिसून येत असते.त्यामुळे परिसरातील नागरिकांनी याचा सामना करावा लागत असल्याने डासांमुळे विविध प्रकारचे आजार होण्याची शक्यता आहे.तसेचं परिसरात सर्वत्र दुर्गंधी पसरत असल्याने अनेकांना श्वसनाचे गंभीर विकार जळण्याची शक्यताही नाकारता येत नाही.

त्यामुळे या गंभीर विषयाकडे नगर पंचायत प्रशासनाने तातडीने लक्ष घालून परिसरातील घाणीचे साम्राज्य नष्ट करून परिसर स्वच्छ करावा.अशा मागणीचे निवेदन नगर पंचायत मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले यांना येथील रहिवासी अनिल बाबुराव गंगतिरे यांनी दिले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.