बोदवड येथे शासकीय कार्यालयात फेस मास्कचे वाटप

0

बोदवड | प्रतिनिधी  

येथील तहसिल विभाग,पोलीस विभाग,विद्युत विभाग व आरोग्य विभाग कडून कोरोनाला आटोक्यात आणण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करून लोकांमध्ये जनजागृती घडवून आणून लोकांना सतर्क करीत आहे.परंतु तहसील,पोलीस व आरोग्य विभागाकडून यात अत्यंत धावपळीचे वातावरण आहे.या विभागांच्या  कर्मचाऱ्यांना कोरोना सारख्या महामारी पासून सुरक्षा करण्यासाठी जळगांव जिल्हा युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रा.हितेश पाटील यांच्या तर्फे तहसीलदार रवींद्र जोगी पोलीस निरीक्षक सुनील खरे,तालुका आरोग्य अधिकारी श्री.चौधरी,बोदवड नगरपंचायत मुख्याधिकारी चंद्रकांत भोसले,गटविकास अधिकारी रमेश वाघ,विद्युत अधिकारी पवार साहेब,नायब तसीलदार दिपक कुसकर यांना प्रत्येकी १०० मास्क चे वाटप करण्यात आले.

सध्याच्या परस्थितीमध्ये जगभरात जीवघेणा कोरोना व्हायरस पसरत आहे.त्याचे पडसाद भारतात व महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहेत.दिवसेंदिवस लागण झालेल्यांची संख्या वाढत असून अशा परीस्थितीत नागरिकांच्या  सामाजिक विलगीकरणासाठी व उपाययोजनासाठी जळगाव जिल्हा तथा बोदवड तालुक्यामध्ये सुद्धा कलम १४४ अंतर्गत सामजिक ठिकाणी व इतरत्र कोठेही समूहाने राहण्यास बंदी आहे.

या जिल्हा युवक काँग्रेस मास्क वाटपा प्रसंगी शहर काँग्रेस अध्यक्ष शेख मेहबूब,युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष पुंजाजी पाटील,माजी अध्यक्ष विकी गायकवाड,दीपक माळी,शुभम पाटील आदी उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.