बोदवड येथे आ.मंगेश चव्हाण यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ ‘भिक मांगो आंदोलन’

0

बोदवड :- मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरे यांच्याबद्दल अवमानकारक ऊद्गार काढल्यामूळे भाजपचे आमदार मंगेश चव्हाण यांच्या वक्त्व्याच्या निषेधार्थ बोदवड शहरात शिवसेना तथा महाविकास आघाडीतर्फे अनोखे आंदोलन करण्यात आले.काही दिवसां अगोदर मुख्यमंत्र्यांनी आमदार मंगेश चव्हाण यांची कोरोनाच्या पार्श्वभूमीवर काळजी घेण्यासाठी सल्ला दिला होता.परंतू,आ. चव्हाण यांनी दुध महाएल्गार आंदोलनात मुख्यमंत्री ऊद्धव ठाकरेंना रिकामचोट मुख्यमंत्री म्हणून संबोधले.या पार्श्वभूमीवर ; मंगेश चव्हाण यांचे मानसिक संतूलन बिघडले असल्यामूळे त्यांना उपचाराची गरज आहे. त्यासाठी त्यांच्या उपचारासाठी हातभार म्हणून शिवसेनेकडून संपूर्ण बोदवड शहरात भिक मांगो आंदोलन करण्यात आले.या आंदोलनात ७७० रुपये जमा झाले असून ते आ.चव्हाण यांना मनिऑर्डर करण्यात येणार असल्याचे शिवसेना कार्यकर्ते दिपक माळी यांनी सांगितले.

आंदोलना वेळी शिवसेना तालूका प्रमुख गजानन खोडके,तालूका संघटक शांताराम कोळी,शहरप्रमूख संजय महाजन, शहरप्रमूख हर्षल बडगूजर, नगरसेवक देवेंद्र खेवलकर, नगरसेवक सुनिल बोरसे, नगरसेवक आनंदा पाटिल, नगरसेवक विजय पालवे, नगरसेवक दिपक झांबड, नगरसेवक ईरफान शेख, ऊपजिल्हा संघटक कलिम शेख, दिपक माळी,विलास माळी,युवक काँग्रेस शहराध्यक्ष रामधन माळी, योगेश राजपूत,जितेंद्र पाटिल,आतिष सारवान,संभाजी साठे,नईम खान,सचिन पाटिल, लालसिंग पाटिल,गजानन पाटिल,बंटि पाटिल,संजय मेंबर, कैलास सुर्यवंशी,भास्कर गुरचळ, गोपाळ पाटिल,रवी बडगूजर , अमोल विल्हेकर,रवी पाटिल, गणेश पाटिल,वासू माळी,सचिन राजपूत,आमिन ठेकदार,समिर शेख,आसिफ पिंजारी,नाझिम ठेकेदार यांच्यासहित महाविकास आघाडीचे कार्यकर्ते ऊपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.