बोदवड तहसिल कार्यालयात लोकशाही दिन साजरा ; तालुक्यातून ३ तक्रारी दाखल

0

बोदवड – येथील तहसिल कार्यालयात लोकशाही दिन तहसीलदार रवींद्र जोगी यांच्या अध्यक्षतेखाली साजरा करण्यात आला असून या लोकशाही दिनी तालुक्यातून ३ तक्रारी प्राप्त झाल्या आहेत.

शासन निर्णय क्र.२०११/प्र.क्र.१८९/११/१६ – अ दि.२६ सप्टेंबर २०१२ अन्वये तालुका स्तरावर  प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी लोकशाही दिन आयोजित करून नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करून निकाली काढण्याचे निर्देश देण्यात दिलेले आहे.

सदर लोकशाही दिनात तिन तक्रारी प्राप्त झाल्या असून सदर तक्रारी संबंधित विभागाला सोपविण्यात आल्या आहेत.

सदर लोकशाही दिनात महा.वि.वि.कं.मर्या‌.बोदवड, पंचायत समिती बोदवड, नगरपंचायत बोदवड,गट शिक्षणाधिकारी बोदवड, सहाय्यक निबंधक बोदवड व इतर शासकीय कार्यालयातील कार्यालय प्रमुख उपस्थितीत होते.तसेच नागरिक व पत्रकार बांधव उपस्थित होते.

सदर कार्यक्रमात उपस्थितांना नागरिकांच्या काही समस्या असल्यास त्याचे निवेदन तालुकास्तरावर आयोजित केलेल्या लोकशाही दिनात करावे असे आवाहन यावेळी तहसीलदार श्री.रवींद्र जोगी यांनी उपस्थितांना केले.

यावेळी उप कार्यकारी अभियंता म.रा.वि.वि.कं.मर्या बोदवड दिपक राठोड,नगरपंचायत कार्यालयीन अधीक्षक राजुसिंग चव्हाण,कृषी अधिकारी पं.स.बोदवड प्रदिप धांडे,केंद्र प्रमुख रविंद्र भालेराव, वनविभागाचे डि.एम.कोळी,भानखेडा वनरक्षक आर.एस.सोनवणे,सहा.अधिक्षक सहकारी संस्था गौतम बावस्कर, दुय्यम निबंधक पी.जे.मोहरकर, भुमी अभिलेख कार्यालयाचे जी.व्ही.इंगळे, पोलिस उपनिरीक्षक भाईदास मालचे, सामाजिक कार्यकर्ते तथा तक्रारदार संजय वराडे,सौ.प्रमिला संजय वराडे तहसील कार्यालयाचे भुषण काळबे उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.