बेलदारवाडी चाकू हल्ल्यातील जखमीची मृत्यूशी झुंज संपली

0

चाळीसगाव :- तालुक्यातील बेलदारवाडी येथे भांडणांचा राग मनात धरून तिघांनी दोन भावांवर चाकूने वार केले होते. या हल्यात ज्ञानेश्वर सुभाष कुमावत (वय ३६) यांचा जागीच मृत्यू झाला होता. तर त्यांचे भाऊ ईश्वर कुमावत (वय ३०) हे गंभीर जखमी झाले होते. जखमी ईश्वर यांचा मृत्यूशी सुरू असलेली झुंज अखेर शुक्रवारी संपली.

मागील भांडणाच्या कारणावरून रविवार, १९ रोजी रात्री ९ वाजता संतोष कुमावत यांच्या घरासमोर सार्वजनिक जागी रात्री दोघांमध्ये वाद झाला. त्यात संतोष कुमावत यांना आरोपी बापू कुमावत याने शिवीगाळ करत तेथे असलेल्या ज्ञानेश्वर कुमावत याच्या छातीवर चाकूने वार केले. त्यामुळे तेथेच रक्ताच्या थारोळयात कोसळून त्यांचा मृत्यू झाला होता.  त्यावेळी संतोष कुमावत व ईश्वर सुभाष कुमावत हे दोघही ज्ञानेश्वर कुमावत यांना वाचविण्यास गेले असता तेथे असलेल्या छोटीबाई गोपीचंद कुमावत व किरणबाई राकेश कुमावत यांनी ईश्वर कुमावत यांना पकडून ठेवले. त्याच वेळी बापू कुमावत याने त्याच्या हातातील चाकूने ईश्वर कुमावत यांच्या पोटात चाकूने वार करून जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. यात ईश्वर कुमावत हे गंभीर जखमी झाल्याने त्यांना शहरातील खाजगी रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. तेथे त्यांच्यावर उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांचा शुक्रवारी पहाटे मृत्यू झाला.

दरम्यान या गुन्ह्यातील आरोपींमध्ये संशयित महिलेचे नाव वाढविण्यासाठी मृतांच्या नातेवाइकांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात ठिय्या दिला. योग्य कारवाईचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. बेलदारवाडी येथील ज्ञानेश्वर कुमावत व बापू उर्फ पिंटू सिताराम कुमावत यांच्यात काही दिवसांपासून वाद होता.

 

Leave A Reply

Your email address will not be published.