बेरोजगारांसाठी खुशखबर ! फक्त एक मुलाखत आणि २ लाखांपर्यंत पगार! रेल्वेकडून भरती सुरू

0

दिल्ली । कोरोना व्हायरस संपूर्ण देशात आर्थिक संकट ओढावलं आहे. यामुळे सगळे व्यापार आणि व्यवहार ठप्प झाले आहेत. कोविड-19 मुळे अनेकांना आपली नोकरी गमवावी लागली त्यामुळे कोट्यावधी लोकांचा रोजगार ठप्प झाला.  मात्र आता रेल्वे विभागाकडून बेरोजगारांसाठी एक आनंदाची बातमी आहे.

 

तरुणांसाठी आता उत्तर रेल्वेने उत्तर रेल्वेच्या मध्यवर्ती रुग्णालयात सीनियर रेसिडेन्सी योजनेत सीनियर रेजिडेंट पदासाठी पात्र उमेदवारांसाठी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. ही एक मोठी संधी आहे. यासाठी इच्छुक उमेदवारांची 5 ते 6 नोव्हेंबर रोजी वॉक-इन मुलाखतीला येऊ शकतात. उत्तर रेल्वे भरती 2020 ची मुलाखत सकाळी साडेआठ ते सकाळी 11 या वेळेत घेण्यात येणार आहेत.

 

वॉक-इन मुलाखतीसाठी उपस्थित असलेल्या उमेदवारांना अर्ज भरावा लागेल आणि त्यावर सही करावी लागेल आणि मुलाखतीच्या दिवशी सकाळी 8.30 वाजता उत्तर रेल्वेच्या मध्यवर्ती रुग्णालयात, नवी दिल्ली येथे सर्व आवश्यक कागदपत्रांसह उपस्थित राहावे लागणार आहे. यासंबंधी रेल्वेकडून माहीती देण्यात आली आहे.

 

या भरतीसाठी २५ जागा आहेत. सीनियर रेजिडेंट असे या पोस्टचे नाव आहे. यासाठी रु. 67,700 – 2,08,700 प्रवेश स्तरावर सातव्या सीपीसीनुसार सुधारित वेतन भत्ते दिले जाणार आहे. निवड वॉक-इन-मुलाखतीच्या आधारे होईल. कागदपत्रांच्या पडताळणीनंतर, भरतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांना मुलाखतीसाठी बोलवले जाईल.

 

5 नोव्हेंबर आणि 6 नोव्हेंबरला सकाळी 8.30 ते 11 वाजेपर्यंत या मुलाखती ऑडिटोरियम, पहिला मजला, शैक्षणिक ब्लॉक, उत्तर रेल्वे मध्यवर्ती रुग्णालय, नवी दिल्ली येथे घेतल्या जाणार आहेत.

 

यामुळे कोरोना काळात ही एक मोठी संधी आहे. आणि पगार पण जास्त आहे. यामुळे या सरकारी नोकरीसाठी गरजूंनी प्रयत्न केले पाहिजेत.

Leave A Reply

Your email address will not be published.