बेपत्ता तरूणाचा मृतदेह आढळला मेहरूण तलावात

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

बेपत्ता असलेल्या तरूणाचा मृतदेह मेहरूण तलावात आढळल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

महेंद्र हिम्मत पाटील (वय ३३, रा. गजानन मंदीराजवळ सुप्रिम कॉलनी जळगाव) हा आई, पत्नी व मुलांसह वास्तव्याला आहे. १७ नोव्हेंबर रोजी महेंद्र पाटील हे दुपारी २ वाजता कामाच्या ठिकाणी जावून येतो असे सांगून दुचाकी घेवून गेला. सायंकाळ झाली परंतू मुलगा घरी आला नसल्याने आई व पत्नी यांनी शोधाशोध केली.

याबाबत त्यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली होती. दरम्यान आज मेहरूण तालावात मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. एमआयडीसी पोलीस ठाण्यात पोहेकॉ संजय धनगर, महेंद्रसिंग पाटील, पोहेकॉ सचिन मुंढे, मुकेश पाटील यांनी घटनास्थळी धाव घेतली. महेंद्र पाटील यांचा मृतहेद असल्याचे निष्पन्न झाले.

मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आला. आत्महत्या करण्याचे कारण अजूनही स्पष्ट झालेले नाही. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.