बुलडाणा पाटबंधारे विभागात जलजागृती सप्ताहाचा समारोप

0

बुलडाणा : राज्य शासनाच्या जलसंपदा विभागाच्यावतीने आंतरराष्ट्रीय जल दिनानिमित्ताने 22 मार्च रोजी जिल्ह्यात 16 मार्चपासून सुरू असलेल्या जलजागृती सप्ताहाचा समारोपीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या सप्ताहाचा समारोप बुलडाणा पाटबंधारे विभागाचे सहा. अभियंता तुषार मेतकर यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करून बुलडाणा पाटबंधारे मंडळ कार्यालयात पार पडला. यावर्षी कोविड साथरोगामुळे सप्ताहात कार्यक्रमांचे आयोजन संसर्ग सुरक्षा नियमांचे पालन करून करण्यात आले. समारोपीय कार्यक्रमाला जिल्ह्यातील कार्यकारी अभियंता, उपविभागीय अभियंता, अधिकारी आदी उपस्थित होते.

सन 2021-2022 मध्ये 10 टक्के सिंचनात वाढ होण्याचे दृष्टीने राजयातील आगामी काळातील भीषण पाणी टंचाई लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर नागरिक तसेच औद्योगिक संस्थांनी करावा, असे आवाहन सहा. अधिक्षक अभियंता तुषार मेतकर यांनी केले. याप्रसंगी जिल्ह्यात विविध विभागाच्यावतीने जलजागृती सप्ताहात राबविण्यात आलेल्या छोटेखानी कार्यक्रमाची माहिती देण्यात आली. देशात कोरोना विषाणूचा होत असलेला वाढता प्रसार लक्षात घेता, कोरोना विषाणू बाबत शासनाने जास्त लोकांच्या उपस्थितीत कार्यक्रम न घेण्याच्या दिलेल्या सुचनेनुसार 16 ते 22 मार्च 2021 या कालावधीत जलजागृती सप्ताहाचे आयोजन मर्यादीत स्वरूपात करण्यात आले. समारोपीय कार्यक्रम यशस्वीतेसाठी अनिल खानझोडे, अंकुश गावीत, एस.एस पाचघरे, भरत राऊत, करण उमाळे, शत्रुघ्न धोरण, प्रदीप पवार आदींनी प्रयत्न केले. संचलन व आभार प्रदर्शन अनिल खानझोडे यांनी केले. कार्यक्रमासाठी जलसंपदा विभागाचे अधिकारी व कर्मचारी आदींनी प्रयत्न केले.

Leave A Reply

Your email address will not be published.