बडनेरा भुसावळ दरम्यान पुलाच्या पुर्नबांधणीसाठी विशेष ब्लॉक

0

भुसावळ :- मध्य रेल्वे भुसावळ विभागामध्ये बडनेरा भुसावळ सेक्शन दरम्यान पुलाच्या पुर्नबांधणीचे  काम करण्यासाठी दि 13 मे रोजी  विशेष इंजीनिरिंग ब्लॉक घेण्यात येणार आहे. त्याकरीता काही पॅसेंजर (सवारी ) गाड्या रद्द करण्यात येणार आहे.

त्यात गाड़ी क्रमांक 51183 डाउन भुसावळ नरखेड पॅसेंजर दि 13 मे सोमवार रोजी रद्द करण्यात आली आहे. गाड़ी क्रमांक 51184  अप  नरखेड भुसावळ पॅसेंजर दिनांक 14 मे मंगलवार  रोजी रद्द करण्यात आली आहे . गाड़ी क्रमांक 51152 अप नरखेड नवी अमरावती पॅसेंजर दिनांक 13 मे सोमवार  रोजी रद्द करण्यात आली आहे. गाड़ी क्रमांक 51151 डाउन  नवी अमरावती नरखेड पॅसेंजर दिनांक 14 मे  मंगळवार रोजी रद्द करण्यात आली आहे. गाड़ी क्रमांक 51197  डाउन  भुसावळ वर्धा पॅसेंजर दिनांक 13 मे सोमवार  रोजी रद्द करण्यात आली आहेगाड़ी क्रमांक 51198  अप वर्धा  भुसावळ पॅसेंजर दिनांक 14 मे रोजी रद्द करण्यात आली आहे. या ब्लॉकमुळे होणा-या  गैरसोयीबद्दल रेल्वे प्रशासनास सहकार्य करावे अशी विनंती रेल्वे  प्रवाशांना  प्रशासनाने विनंती  केली आहे  हे विशेष ब्लॉक प्रवाशांच्या सोयीसाठी पायाभूत सुविधांच्या विस्तारासाठी आवश्यक असल्याचेही रेल्वे प्रशासनाने कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.