बकर्‍या चोरून नेणार्‍या कारची दुचाकीला धडक; खरजई नाक्यावर महिलेचा जागीच मृत्यू

0

चाळीसगाव – चाळीसगाव शहरातून भडगाव रोड कडे बकर्‍या चोरून नेणार्‍या चारचाकी वाहनाने ,खरजईनाका जवळ, एका दुचाकीला धडक दिल्याने 55 वर्षीय महिला जागीच ठार झाली.

नाशिक येथील रहिवासी शोएब पठाण( कार खरेदी विक्री) मंजूर शेख ,सलीम करीम खाँ पठाण ,(कार चालक) राहणार.( सर्व पंचवटी नाशिक) हे तिघे आज सकाळी सहा वाजेच्या दरम्यान नाशिक येथून चाळीसगाव कडे निघाले सकाळी नऊ वाजेच्या सुमारास चारोलेट कंपनीच्या चार चाकी वाहन क्रमांक ाह.15, 689 या गाडीने बामोशी बाबा परिसरात आले. त्यानंतर त्यांनी या परिसरातून आठ बकर्‍या या वाहनात कोंबून, या वाहनाचे चारही काच बंद ठेवण्यात आले होते. काचाना काळ्या रंगाची फिल्म लावली असल्याने आतील काहीच दिसत नव्हते. गाडीत बकर्यांनी आवाज करू नये म्हणून मक्याचे दाणे टाकण्यात आले होते .दरम्यान हे चार चाकी वाहन ,चाळीसगाव शहरातून खरजई नाका भडगाव रोड कडे जात असताना या वाहनाचा कट दुचाकी वाहनांना लागला यावरून दोघांमध्ये अरेरावी झाली .आणि चार चाकी वाहनाने जागेवरून पळ काढला .दुचाकीस्वार आपला पाठलाग करीत असल्याचे लक्षात आल्याने बकर्‍या चोरणार्‍या टोळीने आपल्या गाडीचा वेग वाढवला. मात्र याच दरम्यान खरजई नाक्यावरून भडगाव रोड कडे येत असलेल्या बजाज प्लेटिना या दुचाकी वाहनास जोरदार धडक दिली .या अपघातात दुचाकी वाहनांना मागे बसलेल्या अंजनीबाई पंढरीनाथ चौधरी वय 55 ही महिला जागीच ठार झाली.

सदरील घटना नागरिकांनी बघताच घटनास्थळी धाव घेतली त्यात गाडीत बकर्‍या चोरणार्‍या टोळीतील इसम शोएब पठाण ,व मंजूर शेख ,यांनी तेथून पळ काढला. कार चालक सलीम करीम खाँ पठाण हा घटनास्थळी सापडल्याने जमावाने त्याच चांगला चोप दिला. यानंतर गाडीतून बकर्‍या व व गाडीत असलेल्या विविध प्रकारच्या नंबर प्लेट मिळून आल्याने ही टोळी नेमकी बकर्‍याची चोरी करणार्यांची टोळी असल्याने ,नागरिकांच्या लक्षात आली. ही खबर शहरात वार्‍यासारखी पसरल्याने बकर्‍या च्या मालकांनी घटनास्थळी धाव घेतली व आपल्या बकर्‍या आहेत का हे तपासून बकर्‍या घेण्यासाठी गर्दी केली, तर दुसरीकडे या बकर्‍या चोरणार्‍या टोळीच्या भरधाव वेगाने चालवणार्‍या चार चाकी वाहनामुळे अपघातात महिलेचा नाहक बळी गेल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.या घटनेबाबत चाळीसगाव शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते.

Leave A Reply

Your email address will not be published.