बंद घर फोडून ७० हजाराचा मुद्देमाल लंपास

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

जळगाव  शहरातील श्रीनगर कॉलनी येथील बंद घर अज्ञात चोरट्यांनी फोडून सोन्या चांदीचे दागिने असा एकुण ७० हजार रूपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची  घटना उघडकीला आली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विद्या काशिनाथ पाटील (वय ४९,  रा. श्रीनगर कॉलनी शुभंकर अपार्टमेंट) ह्या आपल्या कुटुंबियांसह राहतात. त्या जिल्हा परिषदेत नोकरीला आहे. १८ ऑगस्ट रोजी सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास कामाच्या निमित्ताने घराला कुलूप लावून बाहेरगावी गेल्या होत्या.  घर बंद असल्याचा फायदा घेवून अज्ञात चोरट्यांनी कडी कोयंडा तोडून त्यांच्या घरातील ३० हजार रूपये किंमतीचे दोन तोळे सोन्याची चैन व पॅन्डल, १५ हजाराचे १ तोळ्याचे कानतले, १५ हजार रूपये किंमतीचे सोन्याच्या अंगठ्या, ३०० रूपये किंमतीचे चांदीचे नाणे असा एकुण ७० हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल चोरल्याची घटना  २० ऑगस्ट रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास उघडकीस आली.

याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक राजेश शिंदे करीत आहे.

 

Leave A Reply

Your email address will not be published.