बंद घरातून ७० हजारांचा मुद्देमाल लंपास

0

जळगाव ;- नातेवाईकांकडे बाहेरगावी गेलेल्या एका कुटुंबाच्या बंद घरातून अज्ञात चोरटयांनी ७० हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केल्याची घटना १६ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास उघडकीस आली . सूत्रांची दिलेली माहिती अशी कि, शाहून नगरातील भोईटे गल्ली येथील शरीफ सफी मोहम्मद भिस्ती वय ४० यांचे ऑटो गॅरेज असून ते अहमदाबाद येथे नातेवाईकांकडे गेले असता त्यांच्या राहत्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरटयांनी ५५ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने, १५ हजारांचे चांदीचे दागिने असा एकूण ७० हजारांचा मुद्देमाल लंपास केला . याबाबत जळगाव शहर पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोहेकॉ उमेश भांडारकर करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.