बँकेत नोकरी करायचीय?

0

आनंद मापुस्कर, करिअर मार्गदर्शक

सध्या देशभरात स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अनेक जागांसाठी भरती चालू आहे. तिथं अर्ज करण्यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागते? निवड प्रक्रिया कशी असते याची माहिती खास मुंटाच्या वाचकांसाठी…

स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये ज्युनिअर असोसिएट (ग्राहक सेवा व विक्री) या पदासाठी जाहीरात प्रकाशित करण्यात आली आहे. देशभरामध्ये एकूण ३७८८ जागा असून महाराष्ट्रामध्ये सुमारे ३९५ जागा भरायच्या आहेत. उमेदवार कोणत्याही एकाच राज्यातील जागांसाठी अर्ज भरू शकतील. ज्या राज्यातील जागांसाठी उमेदवार अर्ज करणार असतील त्या राज्याची भाषा बोलता, लिहीता तसंच वाचता येणं आवश्यक आहे (महाराष्ट्रासाठी मराठी भाषा). निवड प्रक्रियेमध्ये संबंधित राज्याच्या भाषेसंदर्भात उमेदवारीची परीक्षा घेतली जाईल. ज्या विद्यार्थ्यांनी दहावी किंवा बारावीला स्थानिक राज्याच्या भाषेचा विषय घेतला असेल अशा विद्यार्थ्यांना स्थानिक भाषेच्या परीक्षेला सामोरं जावं लागणार नाही.

शैक्षणिक पात्रता- कोणत्याही विषयातील मान्यताप्राप्त विद्यापीठातील पदवीधर

Leave A Reply

Your email address will not be published.