फेबु्रवारीपासून नळ संयोजन; मे अखेर रस्ते पूर्ववत

0

जळगाव दि. 17-
शहरात मे 2019 अखेर सर्व कामे पुर्ण करुन रस्ते पुर्ववत करावे नवीन नळ संयोजनसाठी दरनिश्चिती व फेबु्रवारी महिन्यापासून नळ संयोजन देणेबाबत कार्यवाही तात्काळ सुरु करावी आदी निर्णय अमृत योजनेंतर्गत येणार्‍या अडचणींवर चर्चा करण्यासाठी आयोजित आढावा बैठकीत घेण्यात आले.
स्थायी समिती सभापती जितेंद्र मराठे यांनी दि. 16 रोजी अमृत योजनेंतर्गत कामांच्या जलवाहिन्यांची ठिकठिकाणी पाहणी केली. तेथील रस्ता पुर्ववत करणेबाबत मक्तेदार आर. बी. पाटील, जैन इरिगेशन व पाणी पुरवठा अधिकार्‍यांना सूचना केल्या होत्या. या दौर्‍यात योजनेबाबत येणार्‍या अडचणींसाठी दि, 17 रोजी जितेंद्र मराठे यांनी आढावा बैठक आयोजित केली. बैठकीस प्रभाग अधिकारी विलास सोनवणी, सुशिल साळुंखे, शहर अभियंता डी.एस. खडके, प्रकल्प अभियंता योगेश बोरोले, पाणी पुरवठा युनिटचे शाखा अभियंता व जैन इरिगेशनचे आर.बी. पाटील उपस्थित होते. अमृत योजनेंतर्गत प्रस्तावित जलवाहिन्यांची कामे व नळसयोजनाची कामे तत्काळ करण्याची खबरदारी घ्यावी, योजनेंतर्गत खोदकामाचे मटेरियल वाहण्यासाठी 3 टीम आहेत त्यात 2 टीम वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या. जलवाहिन्या टाकल्यानंतर तेथील नागरिकांनी नळसंयोजनाची रक्कम भरावी याबाबत प्रबोधनासाठी शनिवारपर्यंत बॅनर लावावे याबाबत रिक्शा फिरवाव्या. 1 फेबु्रवारीपासून नळ संयोजन देण्याची कार्यवाही तत्काळ सुरु करावी. मे अखेर कामे पुर्ण करुन रस्ते पुर्ववत करावे. नवीन नळ संयोजनाबाबत दरनिश्चिती करावी, आदी निर्णय घेण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.