प.वि.पाटील विद्यालयात भरणार अभ्यास जत्रा

0

जळगाव दि २८-  केसीई सोसायटी संचालित गुरुवर्य प.वि.पाटील विद्यालयात संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त दि.३० जानेवारी गुरुवार रोजी आयोजित करण्यात आलेली आहे.

सदर जत्रेत इयत्ता ४ थी च्या संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारीत मराठी, गणित,इंग्रजी ,कला,कार्यानुभव ,शारीरिक शिक्षण अशा विषयांचे  वेगवेगळे दालन असून त्यात विद्यार्थी आपले तक्ते , मॉडेल्स , चित्र , वस्तू , शैक्षणिक साहित् , इत्यादी वस्तूच्या वापर करून त्या त्या घटकाची माहिती सांगणार आहे.जत्रा ही अभ्यासाची असून विद्यार्थ्यांना मनमोकळे बोलण्याची , फिरण्याची , प्रश्न विचारण्याची संधी  या जत्रेतून मिळणार आहे.

जळगाव शहारच्या सर्व प्राथमिक शाळांना सकाळी ११ते २  या वेळत जत्रा बघायला मिळणार असून शहरातील सर्व शाळांनी याचा आनंद घ्यावा असे आवाहन शाळेच्या मुख्याध्यापिका रेखा पाटील यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.