प्रभाग क्र.१३ मध्ये रिंग रोड शिवदात्त नगर येथे नव्याने आरोग्य केंद्र व कोविड लसीकरण केंद्राचे उदघाट्न संपन्न

0

भुसावळ (प्रतिनिधी)- आज प्रभाग क्र.१३ मध्ये रिंग रोड शिवदात्त नगर येथे नव्याने उभारण्यात आलेले राष्ट्रीय शहरी आरोग्य केंद्र येथे  नगरसेवक राजेंद्र दत्तु आवटे यांच्या पुढाकारणे आज प्रभागातील नागरिकांच्या सोयी नुसार आरोग्य केंद्र व कोविड लसीकरण केंद्राचे उदघाट्न करण्यात आले. उदघाट्न  आमदार संजय सावकारे, नगरअध्यक्ष. रमण भोळे यांच्या हस्ते करण्यात आले.

तसेच येथे कोविड लसीकरणाला उदया पासून सुरवात होईल. या प्रसंगी आरोग्य सभापती प्रा  दिनेश राठी , नगरसेवक राजेंद्र दत्तु आवटे,सभापती शिक्षणसमिती नगरसेवक मुकेश  गुंजाळ, गिरीश  महाजन, सतीश  सपकाळे,राजेंद्र  नाटकर, प्रमोद  नेमाडे, गौरव आवटे, वेद ओझा, बबलू कानूनगो, राजेश चंदन आरोग्य अधिकारी वर्ग प्रतिभा सरोदे, रामदास बैरागी सर, राजेंद्र सुरवाडे सर, डी.जी. चोपडे सर, राजश्री सोनावणे, आशा पाटील, मनीषा वाकलकर, संध्या दामोदरे, मीना दमाडे, तसलीम पटेल, प्रियांका चौधरी, वैशाली तायडे, पदमा पवार, ललिता आंबोरे व नगर परिषद कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.