प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजनेच्या लाभासाठी अर्ज करण्याचे कृषि विभागाचे आवाहन

0

जळगाव  – प्रधानमंत्री सुक्ष्म खाद्य उद्योग उन्नयन योजना (PMFME) सन 2020-21 ते 2024-25 या पाच वर्षाच्या कालावधीत राबविण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत वैयक्तिक सुक्ष्म अन्नप्रक्रीया उद्योगांना एकूण प्रकल्प किंमतीच्या 35 टक्के व कमाल रु. 10 लाख अर्थसहाय्य देण्यात येणार आहे. या योजनेतंर्गत जळगाव जिल्ह्यासाठी वैयक्तिक लाभार्थ्यांचा भौतिक लक्षांक 15 असून त्यात सर्वसाधारण 14 व अनुसुचित जाती 1 अशाप्रकारे लाभार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे.

या योजनेतंर्गत लाभ घेण्यासाठी केंद्र शासनाने विकसीत केलेल्या पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने अर्ज सादर करणे आवश्यक आहे. त्यासाठी http:pmfme.mofpi.gov.in या वेबसाईटचा वापर करावा. तसेच या योजनेतंर्गत स्वयंसहाय्यता गट/शेतकरी उत्पादक कंपनी/सहकारी उद्योजक संघ यासाठी जिल्ह्याचा भौतिक लक्षांक 10 असून त्यात स्वंयसहाय्यता गट 9 व शेतकरी उत्पादक कंपनी/सहकारी उद्योजक संघ 1 अशाप्रकारे आहे. या योजनेतंर्गत लाभ घेण्यासाठी ऑफलाईन पध्दतीने अर्ज करावा.

या योजनेतंर्गत शेतकरी उत्पादक संघ/शेतकरी उत्पादक कंपनी/संस्था/स्वयंसहाय्यता गट आणि सहकारी उत्पादक किंवा विशेष उद्येश वाहन (S.P.V) यांना ब्रँडींग व मार्केटींग या घटकातंर्गत कच्चामालाची खरेदी ते विक्रीपर्यंत टप्याटप्पयाने हाती घ्यावयाच्या उपक्रमाचा तपशील, महत्वाचा नियंत्रणाच्या बाबी, गुणवत्ता नियंत्रण, उत्पादनाच्या  जाहिरात व प्रचार संबंधित राबवयाचे उपक्रम सहभागी होणाऱ्या उत्पादकांची संख्या व आर्थिक उलाढाल वाढविण्याचा तपशील असणे अपेक्षीत आहे.  प्रस्ताव सादर करण्यासाठी सदर घटकाच्या खर्चाच्या 50 टक्के अनुदान देय राहील त्यात अंदाजे रक्कम रु. 50 लाख पर्यंतचा प्रस्ताव अपेक्षीत आहे.

या योजनेतंर्गत सामाईक पायाभुत सुविधा या घटकांतर्गत शेतकरी उत्पादक कंपनी/शेतकरी उत्पादक संघ/सहकारी उद्योजक संघ/सहकारी उत्पादक संस्था/शासन यंत्रणा/खाजगी उद्योग इत्यादी घटकांना लाभ देण्यासाठी सामाईक पायाभूत सुविधा या घटकातंर्गत प्रस्ताव सादर करावयाचे आहे. या घटकाच्या कर्जाशी निगडीत असुन एकूण खर्चाच्या 35 टक्के अनुदान देय राहील. अधिक माहितीसाठी तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा व आपला अर्ज सदरील तालुका कृषि अधिकारी यांचेकडे जमा करुन त्याची टपाल पोहोच घ्यावी. आवश्यक कागदपत्रे पॅन कार्ड (लाभार्थी स्वत:/ भागीदार), उद्योगाचे नोंदणी प्रमाणपत्र, पत्ता पुरावा, चालु बिल (इलेक्ट्रीक/ पाणी/दुरध्वनी), शेवटच्या सहा महिन्याचे बॅक अहवाल/बँक पासबुक छायांकीत प्रत, उद्योगाचा स्वत:च्या जागेचा पुरावा/भाडेतत्वाचा करार आदि कागदपत्रे आवश्यक असल्याचे संभाजी ठाकूर, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, जळगाव यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.