पोलीस दलात मोठे फेरबदल, ४० वरिष्‍ठ आयपीएस अधिका-यांच्या बदल्‍या

0

मुंबई : बराच काळ रखडलेले बदली आदेश काढताना राज्य सरकारने पोलीस दलात मोठे फेरबदल केले. नवी मुंबईचे पोलीस आयुक्‍तपदी बिपिन कुमार सिंह, नागपूर पोलीस आयुक्‍तपदी अमितेश कुमार यांची, तर मीराभाईंदरच्या पोलीस आयुक्‍त पदी सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईच्यादृष्टीने महत्वाच्या समजल्या जाणाऱ्या गुन्हे शाखेच्या सहआयुक्तपदी मिलिंद भारंबे यांची नियुक्ती करण्यात आली असून, नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांना मुंबईत सहआयुक्त(कायदा व सुव्यवस्था) पदावर आणले आहे.

पोलीस उपयुक्तांच्या बदल्यावरून मध्यंतरी आघाडीत झालेला बेबनाव व नंतर गणेशोत्सवामुळे पोलीस दलातील फेरबदल लांबणीवर पडले होते. अखेर गणेशोत्सव संपल्यानंतर आज तब्बल ४० वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यांचे आदेश काढण्यात आले. पुण्याचे पोलिस आयुक्त के. व्यंकटेशम आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांना कायम ठेवताना नागपूर, ठाणे, नाशिक, नवी मुंबई, पिंपरी चिंचवड, मीरा-भायंदार आदी ठिकाणी नवीन पोलीस आयुक्त देण्यात आले आहेत. बिपीन कुमार सिंह यांची नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी, तर पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तपदी कृष्णप्रकाश यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

नाशिकचे पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांची मुंबईच्या कायदा व सुव्यवस्था तर मिलिंद भारंबे यांची गुन्हे सहआयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. विश्वास नांगरे पाटील यांच्या बदलीमुळे रिक्त झालेल्या नाशिकच्या पोलीस आयुक्तपदी दीपक पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.नाही.नागपूरच्या पोलीस आयुक्‍तपदी अमितेश कुमार यांची, तर सदानंद दाते यांची मीराभाईंदरच्या पोलीस आयुक्‍तपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अमरावतीच्या आयुक्तपदी आरतीसिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

आशुतोष डुंबरे यांची राज्‍य गुप्तवार्ता विभागाचे आयुक्‍त म्‍हणून नियुक्ती करताना, जय जीत सिंह यांची लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अपर पोलीस महासंचालक म्‍हणून बदली करण्यात आली आहे. व्हि.के.चौबे यांची अपर पोलीस महासंचालक लाचलुचपत प्रतिबंधक पदावर, तर भुषण कुमार यांची अपर पोलीस महासंचालक,वाहतूक पदावर बदली करण्यात आली आहे. संजय कुमार यांची अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. दहशतवाद विरोधी पथकाचे अपर पोलीस महासंचालक देवेन भारती यांचीही बदली करण्यात आली आहे. परंतु त्यांची अद्याप कुठेही नियुक्ती करण्यात आलेली नाही. संदीप कर्णिक यांची मुंबईत पश्चिम विभागाचे अतिरिक्त आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.