पैशांसाठी विवाहितेचा छळ; सासरच्यांवर गुन्हा दाखल

0

जळगाव, लोकशाही न्यूज नेटवर्क 

चाळीसगाव तालुक्यातील गणेशपूर येथील विवाहितेचा  प्लॉट घेण्यासाठी माहेरुन एक लाख रुपये आणण्यासाठी  छळ केल्याने पतीसह सासू आणि दीर यांच्याविरोधात चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मुक्ता सुनील कुंभार (वय २८) यांचे माहेर पातोंडा येथील असून 2017 मध्ये तिचा विवाह अनील चिंतामण जगदाळे राहणार गणेशपुर तालुका चाळीसगाव यांच्याशी झाला. सुरुवातीचे काही दिवस बरे गेल्यानंतर पती सुनील जगदाळे यांनी बांधकाम सेंट्रींग व्यवसाय व प्लॉट विकत घेण्यासाठी माहेरुन एक लाख रुपये आणावेत यासाठी  मारहाण करून शिवीगाळ केली.

पैशांसाठी  सासरच्यांनी केलेला शारीरिक व मानसिक त्रास सहन न झाल्याने विवाहितेने पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी विवाहितेच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात पती सुनिल जगदाळे, सासु शकुंतला चिंतामण जगदाळे, आणि दिर अनील चिंतामण जगदाळे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी पुढील  तपास पोलिस नाईक प्रवीण संगीले करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.