पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दुसऱ्या दिवशीही घट ; जाणून घ्या आजचे दर

0

नवी दिल्ली :  सलग सहा दिवसांच्या दर वाढीनंतर पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत दुसऱ्या दिवशीही घट पाहायला मिळत आहे.  गुरुवारी दिल्लीमध्ये पेट्रोल डिझेलचे जुने दरच कायम राहीले. याआधी बुधवारी किंमतीत कोणता बदल झाला नव्हता. गुरुवारी दिल्लीत पेट्रोल 70 रुपये प्रति लीटर तर डिझेल 64.33 रुपये प्रति लीटर होते.

मुंबईमध्ये आज पेट्रोल 76.15 रुपये आणि डिझेल 67.40 रुपये प्रति लीटर आहे. कोलकातामध्ये पेट्रोल 72.75 रुपये तर डिझेल 66.23 रुपये आहे. तर चेन्नईमध्ये 73.20 रुपये आणि डिझेल 67.97 रुपये प्रति लीटर दराने विकले जात आहे.

गेल्या काही दिवसांत आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढल्याने पेट्रोल डिझेलच्या किंमती देखील वाढल्या. भारत आपली तेलाची गरज भागविण्यासाठी साधारण 84 टक्के भागा आयात करतो. आंतरराष्ट्री बाजारात याच्या किंमती वाढल्या की देशातील पेट्रोल डिझेल सहीत पेट्रोल संदर्भातील उत्पादनांवर याचा परिणाम होतो.

Leave A Reply

Your email address will not be published.