पिंपरखेडा येथे पाणी आडवा पाणी जिरवा जनजागृती रॅली

0

जामनेर :- तालुक्यातील पिंपरखेडा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी गावातील नागरिकांना पाणी बचतीचे महत्त्व पटवून देण्यासाठी पाणी आडवा पाणी जिरवा मोहीमे अंतर्गत पाणी बचतीचे फलक हातात घेऊन व घोषणा देत संपूर्ण गावातून जनजागृती रॅली काढण्यात आली होती. त्यावेळी शाळेचे मुख्याध्यापक तायडेसर, शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष संतोष झोंड,उपाध्यक्ष प्रशांत पाटील,नमन फाउंडेशनचे अध्यक्ष मयुर पाटील यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.