पालिकेची नो कोरोना मोहीम नावापुरती; स्वच्छतेकडे दुर्लक्ष

0

भुसावळ | प्रतिनिधी
दिवसेंदिवस राज्यभरात कोविड १९ या जिवघेण्या विषाणु आजाराचा प्रादुर्भाव सर्वत्र वाढलेला आहे. नागरिक खबरदारी घेत आहेत. भुसावळ नगरपालिकेने सुद्धा कोरोना विरोधात लढा देण्यासाठी कंबर कसली पाहिजे होती . मात्र जळगाव रोड सह परिसरात बऱ्याच ठिकाणी अस्वच्छता असल्याने पालिकेचे पितळ उघडे पडले आहे. राष्ट्रीय आपत्तीच्या वेळेस सुद्धा पालिकेने स्वच्छतेकडे लक्ष केंद्रित न केल्यास कोरोनामुळे होणाऱ्या जीवितहानीला प्रशासन जबाबदार राहणार आहे.
कोरोना व्हायरसची लागण गर्दीच्या ठिकाणी होण्याची शक्यता सर्वात जास्त असते. सार्वजनिक वाहतुकीच्या साधनांमध्ये गर्दी सर्वात जास्त असते. पालिकेनं सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचं निर्जंतुकीकरण करण्यावर भर दिला पाहिजे. ‘नो कोरोना’ या मोहिमेअंतर्गत स्वच्छतेबरोबरच खबरदारीचे उपाय योजण्याकडे लक्ष केंद्रीत करावं. विविध भागात औषध फवारणी करावी. येत्या आठ दिवसांत संपूर्ण शहर स्वच्छ होईल. प्रत्येक भागात बसगाड्यांचं निर्जंतुकीकरण करण्यावर भर द्यावा अशी मागणी विशाल ठोके, मनोज ठाकूर, तेजस पाटणकर यांनी आज दिनांक २३ मार्च रोजी नगरपालिका प्रशासनाकडे केली.
जनता कर्फ्युमध्ये नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला, संचारबंदीत नागरिक समाधानी आहेत परंतु स्वच्छतेकडे नगरपालिका प्रशासन गंभीर नाही. शहरात स्वच्छता होत नाही तर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांचा फोन बंद असतो. शहरातील कचरा उचला जात नाही. कोरोनाची पार्श्वभूमीवर कोणते औषध मारले पाहिजे, याची माहितीही आरोग्य विभागाला नाहीय ही परिस्थिती विशाल ठोके यांनी आरोग्य विभागात निवेदन देतांना मांडली.
करोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छता गरजेची असून भविष्यात रोगराई वाढू नये, यासाठी गल्लीबोळातील प्लॅस्टिक टाक्या उचलून आणाव्यात, तुडुंब भरलेल्या गटारी साफ कराव्यात.
श्रीनगर, मोहित नगर, गणेश कॉलनी, भोईनगर, भिरुड कॉलनी हा परिसर अस्वच्छ असून या परिसराला स्वतः भेट देऊन स्वच्छतेची माहिती घ्यावी, अशी मागणी केली आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.