पारोळ्यात तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

0

पारोळा (प्रतिनिधी) :  येथील खांडेकर वाडा मधील रहिवाशी लक्ष्मण (लखा) सदाशिव मराठे यांचा मुलगा मंगेश लक्ष्मण मराठे (वय १७) याने राहत्या घरात कुणी नसल्याचे पाहून गळफास घेत आत्महत्या केल्याची घटना दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास घडली.

याबाबत वृत्त असे की,लक्ष्मण सदाशिव मराठे यांचा सुपुत्र मंगेश याने दुपारी १२.३० वाजेच्या घरी कुणी नसल्याचे पाहून छताला दोरी बांधून गळा आवळून आत्महत्या केल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त आहे.दरम्यान एक महिन्यांपूर्वी मंगेश च्या आईचे निधन झाले आहे.त्यातल्या त्यात पुन्हा एक जीव गेल्याने परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.यांबाबत पोलिसात वडील लक्ष्मण सदाशिव मराठे यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास सहाय्यक पोलीस पो,काॅ, बापू पाटील करीत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.